chhagan bhujbal esakal
नाशिक

विरोधकांच्या नातेवाईकांवर छापे टाकणे हा अतिरेक : छगन भुजबळ

'नातेवाईकांच्या घरावर छापे टाकण्याचे प्रकार लोकशाहीत प्रकार क्वचित घडले असतील, मात्र आता सर्रास सुरु झाले आहेत...'

विनोद बेदरकर

नाशिक : केंद्रा शासनाच्या विरोधात जास्त बोललं तर तोंड बंद करण्यासाठी केंद्राच्या वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर सुरु आहे. पण आता त्यापुढे जाउन विरोधकांच्या नातेवाईकांच्या घरी छापे टाकण्याचे प्रकार म्हणजे अतिरेक आहे. असा आरोप पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला.



कोरोना आढावा बैठकीनंतर उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या वरील कारवायांबाबत भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, केंद्र शासनाच्या विविध यंत्रणाकडून जे सुरु आहे. ते अतिशय विचित्र सुरु आहे. राजकिय विरोधकांना त्रास देण्यासाठी त्यांच्यावर कारवाया करतांना त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापे टाकण्याचे प्रकार म्हणजे लोकशाहीत असे प्रकार क्वचित घडले असतील, मात्र आता सर्रास सुरु झाले आहे. नातेवाईकांच्या घरी जाऊन कारवाई करणं हा अतिरेक आहे.



आमचे तीन पक्षाचे सरकार झगडे होणारच

जिल्ह्यात काही दिवसांपासून शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्यात राजकिय आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी भुजबळ यांच्या वर आरोप केले असतांना दोन दिवसांपूर्वी माजी आमदार योगेश घोलप यांनी देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांच्यावर श्रेय चोरीचे आरोप केला महाविकास आघाडीतील या धुसफूसबाबत श्री भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही सर्व एकत्र काम करतोय. एका पक्षाच्या सरकारमध्येही मतभेद व झगडे होतात, आमचे तर तीन पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे आरोप- प्रत्यारोपांकडे फार लक्ष देउ नका.



टोल बंद केले म्हणून खड्डे

भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहातूक मंत्री नितीन गडकरी यांचे राष्ट्रीय महामार्गावरील खड्यांकडे लक्ष वेधले होते. राष्ट्रीय महामार्गासोबत राज्य महामार्गाच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्याविषयी श्री भुजबळ यांना विचारले असता, राज्य मार्गावरील टोल बंद केले तर राष्ट्रीय महामार्गावरील टोल मात्र सुरुच आहे. सर्व राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्गाला देऊन टाकावे असा उपाय सुचविला. लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडा बाबत भुजबळ यांनी निषेध केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जालियनवाला हत्याकांड बरोबर लखीमपूरची केलेली तुलना योग्यच आहे. या घटनेच्या विरोधात सर्वांनी मिळून ११ तारखेला कडकडीत बंद पाळीत बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरण निम्म्याहून अधिक भरलं! पण 100 टक्के भरण्यासाठी अजून किती टीएमसी पाण्याची गरज? पाहा लेटेस्ट अपडेट

IND vs ENG Weather Update: भारत-इंग्लंड शेवटच्या टी२० सामन्यात पावसाचा धुमाकूळ की होणार पूर्ण खेळ? हवामान खात्याने दिला 'हा' इशारा...

Latest Marathi News Live Update : येरवडा गणेश नगर परिसरात दोन गटांतील मुलींमध्ये जोरदार हाणामारी

Hingoli: माळसेलूत चिखल तुडवत विद्यार्थी शाळेत ; रस्त्याची दुरवस्था; पालकांत तीव्र संताप; आरोग्याचा प्रश्नही गंभीर, ग्रामपंचायतीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या 2 तरुणांची 10 तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात 112 तरुणांची झाडाझडती

SCROLL FOR NEXT