chhagan bhujbal esakal
नाशिक

Chhagan Bhujbal News : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी 7 आमदारांमुळे राष्ट्रवादीचा ‘क्लेम' : छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal News : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर झाली आणि त्यात नाशिकसह रायगडचा समावेश नाही. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ आणि पूर्वीचे आमचे इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरचे आमदार हिरामण खोसकर असे ७ आमदार आहेत. (Chhagan Bhujbal statement about nashik guardian minister post claim news)

त्यामुळे सर्वाधिक आमदार आमचे असल्याने नाशिकच्या पालकमंत्रीपदावर आणि रायगडमध्ये आमचे खासदार असल्याने कोकण विभागातील एका जिल्ह्यातील पालकमंत्रीपदावर आमचा ‘क्लेम' आहे, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले, की आमच्या अगोदर मुख्यमंत्र्यांच्या गट भारतीय जनता पक्षासोबत राज्याच्या सत्तेत सहभागी झाला आहे. आम्ही नंतर सत्तेत समाविष्ट झालो.

त्यामुळे अगोदर पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली, त्यांची समजूत काढणे आणि आमच्याकडे पालकमंत्रीपद देण्याच्या प्रक्रियेत वेळ जातो आहे. सामंजस्याच्या भूमिकेतून, चर्चेतून मार्ग निघतात. चर्चा सुरु आहे. पण मी चर्चेत नाही. मार्ग कधी निघेल तेंव्हा निघेल, जनतेचे काहीही अडलेले नाही.

वडाची साल पिंपळाला नकोय

ओबीसींसाठी आवाज उठवत असल्याने पालकमंत्रीपद देण्यात अडचण येते काय? या पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना भुजबळ म्हणाले, की पालकमंत्रीपद आणि ओबीसी यात काहीही संबंध नाही. मुळातच, किती पालकमंत्री ओबीसींच्या बाजूने उभे राहतात. गेल्या ३५ वर्षांपासून आम्ही ओबीसींसाठी भांडत आहोत. त्यामुळे वडाची साल पिंपळाला लावण्यात अर्थ नाही.

निवडणूक आयोग योग्य घेईल निर्णय

खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात, त्या निवडणूक आयोगापुढे काय मांडणार आहेत, हे मला माहिती नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कायदेशीर लढाईत जाणार नाही, असे म्हटले होते. त्यांनी कायदेशीर मार्गाने नोटिसा दिल्या. इकडून त्यांना नोटिसा देण्यात आल्या. शिवाय पक्षात वाद निर्माण होतात, तेंव्हा निवडणूक आयोगाला सुनावणी घ्यावी लागते. निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT