chhagan-bhujbal
chhagan-bhujbal Google
नाशिक

छगन भुजबळ म्हणाले, सचिन पाटिल यांची बदली थांबवणारा मी कोण?

विनोद बेदरकर

नाशिक : पोलिस अधीक्षक सचिन पाटील (Sachin Patil) यांची बदली रद्द करण्यासाठी मला निवेदन आले आहे, पण मी त्या खात्याचा मंत्री नाही. पोलिस अधीक्षक बदल्यांचा विषय गृहमंत्र्यांच्या खात्याचा विषय आहे. त्या खात्यांचे सक्षम मंत्री आहे, याशिवाय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत. मी बदली थांबविणारा कोण? असे स्पष्ट करीत, पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी हा विषय टोलावून लावला.



पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या बदली रोखण्यासाठी शहरातील काही सामाजिक संघटना सक्रिय झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांकडे अडकून पडलेले पैसे काढून देण्यासाठी पाटील सक्रिय होते. त्यामुळे त्यांची बदली थांबवावी अशी मागणी आहे. त्यानुषंगाने भुजबळ यांनी हा विषय गृहमंत्र्यांकडील असल्याचे सांगत हात झटकले.

कोरोना आढावा बैठकीनंतर भुजबळ बोलत होते. ओबीसी आरक्षणावरुन निवडणूका पुढे ढकलता येणार नाही. असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश झाला असून त्याविषयी विचारले असता, भुजबळ म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूका पुढे ढकलल्या आहेत. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने निवडणूका पुढे ढकलण्याचा विषय नाही. कोरोना निर्बंधामुळे निवडणूका पुढे ढकलल्या असतांना याच लांबलेल्या काळात ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लावण्याचे काम संपवून टाकू असे शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने याविषयी मुख्यमंत्र्यासह राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष सर्वसहमतीने पुढील निर्णय घेतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT