Chhagan Bhujbal esakal
नाशिक

Bhimashankar Controversy | पंढरपूरच्या विठ्ठलासह तुळजापूर, सप्तशृंगही न्या! : आसामच्या CM ना भुजबळांचा टोला

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भिमाशंकर आसाममध्ये असल्याचा दावा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केल्याप्रकरणी त्याची खिल्ली उडवत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी चाळीस आमदार गुवाहाटीला गेले असताना तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला सर्व देऊ असे तरी सांगितले नसेल ना?

असे म्हणत श्री. भुजबळ यांनी भिमाशंकर, पंढरपूरचा विठ्ठल, तुळजापूरचे तुळजाभवानी, सप्तशृंग घेऊन जा, अशा शब्दांत टोला लगावला. (chhagan bhujbal statement Trolled Assam CM over bhimashaknar controversy Nashik News)

पत्रकारांशी संवाद साधताना श्री. भुजबळ यांनी महागाई, बेरोजगारी, कामगार, शेतकरी अशा ज्वलंत प्रश्‍नांवरील लक्ष विचलित करण्यासाठी नवे फंडे काढत चर्चा घडवली जात आहे, अशी टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना देण्यात आलेल्या धमकीविषयी श्री. भुजबळ म्हणाले, की धमकी देणारे कोण आहेत, याचा शोध घेऊन पोलिसांनी कारवाई करावी. तसेच पोलिस कोठडीतून फोन कसे करता येतात? मोबाईल कसे मिळतात? हे सरकार आणि पोलिसांनी पाहावयास हवे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

ठाकरे अन महाविकासबद्दल सहानुभूति

शिवसेना, निवडणूक चिन्ह कोणाचे? अशी चर्चा घडवली जात असताना नेते, कार्यकर्ते एकीकडून तिकडे जात आहेत. त्यातून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीबद्दल सहानुभूति वाढत आहे.

शिवाय मतदार हलणार नाही, असा दावा श्री. भुजबळ यांनी केला. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना श्री. भुजबळ म्हणाले, की विधीज्ञ विविध मुद्दे मांडताहेत. कायद्याची गुंतागुंत झाली आहे. त्यामुळे विधीज्ञ आणि सर्वोच्च न्यायालय कसे मार्ग काढते हे समजेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT