chhagan bhujbal esakal
नाशिक

नाशिक : उड्डाणपुल उदघाटन कार्यक्रमावरुन छगन भुजबळ नाराज

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : आज मुख्यमंत्री (CM uddhav thackeray) नाशिकमध्ये होते. त्यांच्या हस्तेही नाशिकच्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची (flyover inaugration) फित कापता आली असती..इतकी घाई का केली माहित नाही, मुळात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, ईतर अधिकारी यांच्या उपस्थितीत सोहळा व्हायला हवा होता, तसेच नाशिकमध्ये असतांनाही त्यांना खासदार हेमंत गोडसेंकडून निमंत्रण नाही. असं वक्तव्य उड्डाणपुलाच्या उदघाटन कार्यक्रमावरुन नाराज छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी केले.

नाशिकमध्ये असतांनाही गोडसेंकडून निमंत्रण नाही

दरम्यान काल (ता.8) नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसेंच्या हस्ते झालेल्या उड्डाणपुलाच्या उदघाटन कार्यक्रमाला स्थानिक नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी तूफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता के के वाघ कॉलेज ते जत्रा हॉटेल दरम्यान 2.6 किमी उड्डाणपुल तयार करण्यात आला जवळपास 457 कोटी रुपयांचा हा उड्डाणपूल बनवण्यात आलाय.

तूफान गर्दी, नियम धाब्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला शिवसेना नेत्यांकडूनच केराची टोपली दाखवली जातीय. नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसेंच्या हस्ते झालेल्या उड्डाणपुलाच्या उदघाटन कार्यक्रमाला स्थानिक नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी तूफान गर्दी केली. यावेळी गोडसेंसह अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हता ..काल वरुण सरदेसाई तर आज हेमंत गोडसेंच्या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले गेले. रविवार पासून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. याच कार्यक्रमा दरम्यान नियम पायदळी तुडवले गेले, याबाबत शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना विचारले असता,उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांची गर्दी झाली असं अजब उत्तर त्यांनी दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT