Former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal while inspecting the employment of disabled persons in Cotton Industry Group. esakal
नाशिक

दिव्यांगाच्या पैठणी कलाकारीने भुजबळ भारावले!

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : कुणाला ऐकू येत नाही तर कुणाला बोलता येत नाही...मात्र, त्यांच्या अंगी असलेले गुण पाहून कोणीही आश्चर्यचकित होतो. वडगाव येथील कापसे पैठणीच्या हस्तकला व विणकाम केंद्रातील दिव्यांग मुलांची पैठणी विणण्याची ही अफलातून किमया पाहून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळही भारावले!

या ठिकाणी कापसेंतर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना पैठणी विणकामाचे प्रशिक्षण देण्यात येऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देत स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. (Chhagan Bhujbal Visit to cotton industry group of Vadgaon handicrafts weaving cow school nashik news)

श्री. भुजबळ यांनी वडगाव बल्हे येथील कापसे उद्योग समूहाला भेट दिली. त्यांनी याठिकाणी दिव्यांग कारागिरांनी साकारलेल्या पैठणीवरील हस्तकला व विणकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. कापसे कुटुंबियांतर्फे कापसे उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब कापसे, दिलीपदाजी खोकले यांनी भुजबळ यांचे स्वागत व सन्मान केला.

त्यांनी कापसे उद्योग परिसरातील कापसे फाऊंडेशनच्या अहिल्या गोशाळा, आदिवासी विद्यार्थी विणकर प्रशिक्षण केंद्र, दिव्यांग मूकबधिर मुलांचे मोफत प्रशिक्षण केंद्र, निवासव्यवस्था, पैठणी विणकर कलाकेंद्राची पाहणी केली.

दिव्यांग बांधवांची राहण्याची व भोजनाची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. या सर्व सुविधांची भुजबळांनी बाळासाहेब कापसे यांच्याकडून माहिती घेऊन अपंगांसाठी रोजगार निर्मिती केल्याबद्दल विशेष कौतुक केले.

पैठणी विणकाम, निर्मिती, विक्री तसेच दिव्यांगांना मिळणारा रोजगार याबाबतही भुजबळांनी माहिती घेतली. अतिशय शिस्तबद्ध काम करून लाखो रुपयांच्या पैठण्या हे दिव्यांग विणकाम करत असल्याची माहिती कापसे यांनी दिली. अहिल्या गोशाळेमध्ये ४०० वर गीर गाई असून अतिशय अद्ययावरित्या त्यांचे संगोपन केले जाते, याची देखील भुजबळाणी पाहणी करून कौतुक केले.

येवला पैठणीची क्रेज आजही महिलांमध्ये आहे, मात्र दाक्षिणात्य राज्यातून बाजारात येणाऱ्या सेमी पैठणीला ब्रेक लागावा, येवला पैठणीची इतरत्र डुप्लीकेट होते त्यांच्यावर बंदीसाठी पुढाकार घ्यावा तसेच पैठणीच्या बाजारपेठेला उर्जितावस्था देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी बाळासाहेब कापसेंनी भुजबळाकडे केली.

वडगावच्या सरपंच सुशीला कापसे, मीरा कापसे, जालिंदर कांडेकर, किशोर कापसे तसेच तहसीलदार प्रमोद हिले, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष वसंत पवार, ज्ञानेश्वर शेवाळे, सचिन कळमकर, शहराध्यक्ष दीपक लोणारी, मकरंद सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कापसे उद्योग समूह सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मुंबई लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी सज्ज

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT