Chhatrapati Sambhaji Stadium esakal
नाशिक

Nashik News : छत्रपती संभाजी स्टेडियम NMCचे की खासगी ट्रेनिंग सेंटरचे?

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : सिडको परिसरातील छत्रपती संभाजी स्टेडियम येथे सिडको परिसरातील अनेक रहिवासी सकाळ व सायंकाळच्या वेळेस व्यायाम करण्यासाठी व आरोग्य सुदृढ राहण्याकरिता पायी चालण्यासाठी येत असतात. परंतु त्यांना येथे वाईट अनुभव येत असून, त्यांना खासगी सैनिक व पोलिस प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या प्रशिक्षनार्थी विद्यार्थ्यांनाचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासीयांच्या वतीने करण्यात येत आहे. (Chhatrapati Sambhaji Stadium NMC or private training center Nashik News)

संबंधित स्टेडियमवर परिसरातील महिला, पुरुषांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने व्यायाम करण्यासाठी आले असता, मैदान खासगी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या ताब्यात असल्यासारखे चित्र निर्माण झाले असून, सर्व ज्येष्ठ नागरिक घाबरलेल्या अवस्थेत फिरत असतात. सकाळच्या सुमारास त्यांचा सराव सुरू असताना ज्येष्ठ नागरिकांना धक्काबुक्की करत असतात. या मुलांकडून शिवीगाळ करणे व जोरजोरात ओरडण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपदेखील स्थानिक रहिवासीयांच्या वतीने करण्यात येत आहे.

या व्यतिरिक्त त्यांचा सराव सुरू असताना प्रचंड धूळ उडणे व नागरिकांना पायी चालण्यास जागादेखील नसल्याने याबाबत मनपा प्रशासनास वेळोवेळी तक्रार करूनही काहीही उपयोग झालेला नसल्याने ही जागा नाशिक महापालिका प्रशासनाची की खासगी ट्रेनिंग सेंटरवाल्यांची, असा प्रश्न उपस्थित होत असून, याबाबीवर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक रहिवासीयांमधून जोर धरू लागली आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

"छत्रपती संभाजी महाराज स्टेडिअम येथे सकाळी फिरण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी नियमित जात असतो. सध्या हे स्टेडिअम पूर्णतः खासगी प्रोफेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या ताब्यात असल्यासारखे चित्र आहे. या जागेचा वापर अत्यंत चुकीच्या प‌द्धतीने केला जात असून, दडपशाही वाढल्याची भावना आहे. सर्व स्टेडियम धुळीने व्यापले जाते व त्यामुळे श्वसनाचे आजार, घशाचे आजार वाढीस लागत आहे."

- नीलेश वाघ, आर्किटेक्ट, नाशिक

"गेल्या दहा वर्षांपासून सकाळी नियमित फिरायला जात असतो. परंतु गेल्या दोन वर्षांपासून खासगी ट्रेनिंग संस्थांनी स्टेडिअमचा वापर सुरू केला असून, स्टेडिअम जणू विकत घेतल्यासारखे आचरण करतात. एकाच वेळी शंभर ते १५० मुले-मुली ट्रॅक वर पळतात, त्यामुळे खूप धूळ उडते. या खासगी संस्थांच्या दादागिरीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, मानसिक त्रासदेखील वाढला आहे."- संजय वामन भामरे, स्थानिक रहिवासी

"याबाबत नागरिकांची तक्रार आली असून, यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना पाहणी करण्यासाठी पाठवले जाणार आहे. तर यामध्ये सत्यता आढळल्यास संबंधित ट्रेनिंग सेंटरवर योग्य कार्यवाही करण्यात येईल."-डॉ. मयूर पाटील, विभागीय अधिकारी, सिडको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT