Child patients who received successful treatment at HCG Humanity Cancer Center participated in a special function organized on the occasion of Diwali at Chief Minister's official residence 'Varsha'. esakal
नाशिक

Diwali Festival: बालकांसोबत मुख्यमंत्र्यांची दिवाळी; HCG मानवता कॅन्‍सर सेंटरचे 16 वॉरिअर्स सहभागी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई येथे ‘वर्षा’ बंगल्‍यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दुर्धर आजारावर मात केलेल्‍या बालरुग्‍णांसोबत दिवाळी साजरी केली. या देदीप्यमान सोहळ्यात नाशिकच्‍या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर येथे उपचार घेतलेले सोळा रुग्‍ण सहभागी झाले होते.

सेल्‍फी घेत, गोडधोड पदार्थांवर ताव मारत व आतषबाजी करताना सणाचा आनंद लुटला. याविषयी एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचे एमडी व चीफ सर्जिकल ऑन्‍कॉलॉजिस्‍ट ॲण्ड रोबोटिक सर्जन प्रा.डॉ. राज नगरकर यांनी माहिती दिली. (Chief Minister shinde Diwali with Children 16 Warriors participants from HCG Humanity Cancer Center nashik)

दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एकूण ५० बालरुग्‍णांनी सहभाग नोंदविलेला होता. नाशिकहून रवाना झालेल्‍या रुग्‍णांसोबत डॉ.राज नगरकर, हॉस्‍पिटलच्‍या मेडिकल ऑन्‍कॉलॉजिस्‍ट डॉ. श्रृती काटे, रक्‍तविकार तज्‍ज्ञ डॉ. प्रियतेश द्विवेदी सहभागी झाले होते.

मुंबईत हृदयरोगावर उपचार घेतलेले व कॉकनियर इम्‍प्‍लांट झालेले बालरुग्‍ण देखील सहभागी झाले होते.

यावेळी डॉ. नगरकर म्‍हणाले, की सहभागी प्रत्‍येक बालक व त्‍यांच्‍या कुटुंबीयांसाठी हा सोहळा अविस्‍मरणीय राहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्‍या संकल्‍पनेतून हा कार्यक्रम उत्‍साहात पार पडला. मुख्यमंत्र्यांनी प्रत्‍येक बालकाची भेट घेत त्‍यांच्‍या तब्‍येतीची विचारपूस केली.

सहाय्यता निधी वाढविण्याचे आश्‍वासन

मज्‍जारज्‍जू प्रत्‍यारोपण (बोनमॅरो ट्रान्‍सप्‍लांट) याकरिता मुंबई, पुण्याच्‍या तुलनेत खूप कमी खर्चात नाशिकला यशस्‍वी उपचार केले जात आहेत. तरीही ही उपचार प्रक्रिया खर्चिक असल्‍याने सुमारे सत्तरहून अधिक बालरुग्‍ण प्रत्यारोपाच्या प्रतिक्षेत आहेत.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थिती जाणून घेताना रुग्‍णांना सहाय्यता होण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन ऐवजी तीन लाखांची मदत करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन श्री.शिंदे यांनी दिले.

...तर राज्‍यभरातील बालकांना मिळू शकतील मोफत उपचार

मुंबईत सुमारे २५ लाखांचा खर्च येत असताना नाशिकमध्ये १२ ते १४ लाख रुपयांमध्ये मज्‍जारज्‍जू प्रत्‍यारोपण केले जाते आहे. टाटा ट्रस्‍ट, कोलइंडिया ट्रस्‍ट यांसारख्या संस्‍थांकडून बालकांना उपचारासाठी अर्थसाहाय्य उपलब्‍ध करून दिले जाते आहे.

जर हा निधी उपलब्‍ध झाला तर राज्‍यभरातील बालकांना मोफत उपचार मिळणे शक्‍य होऊ शकते, असा विश्‍वास डॉ.नगरकर यांनी व्‍यक्‍त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT