death news esakal
नाशिक

नाशिक : ट्रॅक्टरखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यु

नरेश हाळणोर

नाशिक : उघड्या डीपीमुळे आठ वर्षीय मुलाचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असतानाच, गंगापूर शिवारात ट्रॅक्टरवरून तोल गेला आणि चाकाखाली सापडून पाच वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यु (Death) झाल्याची घटना घडली. राघव दिनकर शिंदे (५, रा. शिंदे चाल, ध्रुवनगर, गंगापूर रोड) असे मयत मुलाचे नाव असून, याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (child died under tractor Nashik News)

सदरील घटना रविवारी (ता.३) दुपारी घडली आहे. दिनकर शिंदे (३८) यांनी ट्रॅक्टरला पाण्याचा टँकर जोडला. त्यावेळी त्यांनी ट्रॅक्टरवर त्यांच्या डाव्या बाजुला त्यांचा पाच वर्षांचा मुलगा राघव यास बसविले. ट्रॅक्टर चालू करून ते चालवित असताना, काही अंतरावर गेले. याच दरम्यान त्यांचा मुलगा राघव याचा तोल गेला आणि तो ट्रॅक्टरवरून खाली पडला. या दूर्घटनेमध्ये राघव ट्रॅक्टरच्या डाव्या बाजुकडील चाकाखाली सापडला आणि गंभीररित्या जखमी होऊन या दर्दैवी घटनेत त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यामध्ये पिता दिनकर शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेंडेकर हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Racism in Australia : भारतीयांना मारुन टाका अन् त्यांच्या बायका गुलामगिरीसाठी विका... ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

College Student Death : वाढदिवसाच्या 3 दिवस आधीच काळाचा घाला! कोल्हापुरात 18 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; घरात कोणी नसताना संपवलं जीवन

Hingoli: हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; वसईजवळ ३.५ तीव्रतेची नोंद, जीवित-वित्तहानी टळली..

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत पुन्हा भूकंप, 3.5 रिश्टर्स स्केअर भूकंप झाल्याची भूमापक केंद्रावर नोंद

...अन् अचानक सेटवर आले रोहित शेट्टी! 'Governor' च्या शूटिंग दरम्यान चिन्मय मांडलेकरसोबत घडला रंजक प्रसंग

SCROLL FOR NEXT