Crime News esakal
नाशिक

Nashik Child labor Crime: गरीब नवाज हॉटेलमध्ये आढळले बालकामगार; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Nashik Child labor Crime : बालकामगार विरोधी पथकाने धाड टाकत भद्रकाली परिसरातील गरीब नवाज हॉटेलवर कारवाई केली. या वेळी हॉटेलमध्ये दोन बालकामगार आढळून आले.

याप्रकरणी दुकान निरीक्षक विशाल प्रल्हाद जोगी यांच्या फिर्यादीवरून हॉटेलमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Child labor found in Garib Nawaz Hotel Filed case nashik Crime news)

भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीतील विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या बालकामगारांची मुक्तता करण्यासाठी कृती दलामार्फत मंगळवारी (ता. १३) धाडसत्र राबविण्यात आले. त्यानुसार कामगार उपायुक्त कार्यालयातून भद्रकालीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत पत्र देण्यात आले.

पोलिस कर्मचारी, तसेच पंच जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाचे हर्षवर्धन पवार, सामाजिक कार्यकर्ते विजय माळी यांनी कारवाई केली. पथकाने गरीब नवाज हॉटेलमध्ये छापा घातला असता, दोन बालकामगार साफसफाई व वेटरचे काम करताना मिळून आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हॉटेलमालक नदीम याकूब तांबोळी बालकामगारांकडून कमी वेतनात जास्त श्रमाचे काम करून शोषण करीत असल्याचे निदर्शनास आले. मुक्त केलेल्या बालकामगारांना बालगृह, उंटवाडी रोड येथे दाखल केले.

बालकामगार विरोधी भरारी पथकाकडून मोहीम अधिक तीव्र राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले असल्याचे कामगार उपायुक्त विकास माळी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT