bride.jpeg
bride.jpeg 
नाशिक

अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अवघ्या १३ वर्षांची असताना विवाह झालेल्या त्या बालिकावधूची जीवनयात्रा संपली.. हा विवाह तिच्यासाठी एकप्रकारे मृत्यूचे फर्मानच ठरला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हा विवाह तिच्यासाठी एकप्रकारे मृत्यूचे फर्मानच

दिंडोरी तालुक्यातील करंजवण येथे मे २०२०मध्ये म्हणजे अगदी कडेकोट लॉकडाउन असताना हा बालविवाह पार पडला होता. विवाहाच्या साडेसहा महिन्यानंतर मुलीच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे बालवधूसह तिचे सासरचे करंजवणला पोहोचले. २४ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घरातील गरम पाण्याने भरलेला ड्रम सांडला आणि त्यात बालवधूसह तिची नणंद भाजली. पाठीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना दिंडोरी आणि पुढे आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, मुलीच्या आईसह सासरच्यांमध्ये वाद उभे राहिले आणि त्यातूनच बालविवाहाचा प्रकार आला. पुढे याच वादामुळे बालवधूच्या आईने मुलीला कधी दिंडोरी, तर कधी नाशिक येथे उपचार दिले. अनेक उपाय करण्यात आले. मात्र, तिचे दुखणे वाढतच गेले आणि तिचा शनिवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. उपचारांसाठी हॉस्पिटलमध्येच असलेली तिची नणंद बरी झाली.

दोन महिन्यांच्या उपचारानंतर तिची मृत्युशी झुंज अखेर संपली

माहेरीच एका अपघातात भाजलेल्या बालवधूवर २४ नोव्हेंबरपासून उपचार सुरू होते. दोन महिन्यांच्या उपचारानंतर तिची मृत्युशी झुंज अखेर संपली. बालविवाहाचा गुन्हा नोंद असलेल्या पोलिस ठाण्यातच आता मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुलीच्या आईसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण संजय बिडवे, संजय बिडवे, संगीता बिडवे (सर्व रा. खंबाळेवाडी, घोटी, ता. इगतपुरी), तसेच बालवधूची आई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईसह चौघांवर गुन्हा

बालविवाहप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल असून, मुलीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी कलम ३०४ (अ) नुसार संबंधित चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. वणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत म्हणाले, 'या प्रकरणी सासरच्या तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले; तसेच त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. मुलीच्या आईला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : आयटी अभियंता तरुणीच्या नावावर परस्पर उचलले ४५ लाखांचे कर्ज; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Mumbai News : मानखुर्द येथील विषबाधा प्रकणी अधिकाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; गर्जना संघटनेची मागणी

Prajakta Mali : अखेर सही झाली! प्राजक्ता माळीच्या आयुष्यात घडतंय काय? म्हणते "आयुष्यातील सर्वात..."

GT vs CSK : गुजरात करो या मरो स्थितीत; सीएसके प्ले ऑफच्या शर्यतीत सेफ होण्यासाठी जोर लावणार

SRH vs LSG: लखनौचा लाजीरवाणा पराभव अन् संघमालकांनी राहुलला झाप-झाप झापलं; सोशल मीडियावर नुसता मीम्सचा पाऊस

SCROLL FOR NEXT