measles patients esakal
नाशिक

Measles Infection : नाशिकच्या बालकांची तूर्त गोवरमधून सुटका

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई शहरात डोके वर काढलेल्या गोवरने मालेगावमध्येदेखील हाहाकार उडवला आहे. मात्र, मालेगावपासून नजीक असलेल्या नाशिकमध्ये मात्र सध्या तरी गोवरची एकही तक्रार आली नसल्याचे महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी माहिती दिली. गेला सव्वादोन वर्षांपासून कोरोनाचा सामना करणाऱ्या नाशिककरांना या वर्षी कोविडपासून मोठा दिलासा मिळाला आहे. (Children of Nashik now free from Measles Infection Nashik News)

मात्र, कोविडमधून दिलासा मिळाला असला तरी डेंगीने तोंड वर काढले आहे. नुकताच पावसाळा संपल्याने वातावरणातील बदल तसेच घराच्या कानाकोपऱ्यात शिरलेल्या स्वच्छ पाण्यातून डेंगीच्या आळी होत असल्याचे समोर आले आहे. शेजारच्या मुंबईमध्ये गोवर आजाराने मोठ्या प्रमाणात तोंड वर काढले आहे. लहान मुलांना गोवरची लागण होत असल्याने मुंबई महापालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातदेखील गोवरचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

महापालिकेचे विविध खासगी रुग्णालयांमध्ये पन्नासहून अधिक गोवरचे रुग्ण दाखल झाले आहेत. मात्र, गोवरची लागण झालेल्या बहुसंख्य रुग्णांनी गोवरची लस घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. याच अनुषंगाने नाशिक महापालिकेत चौकशी केली असता शहरात अद्यापपर्यंत गोवरचा एकही रुग्ण नसल्याचे दिलासादायक बाब समोर आली आहे. मात्र, असे असले तरी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. वातावरण बदलत असल्याने सर्दी- खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे महापालिकेचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT