chinmay Udgirkar esakal
नाशिक

Nashik Film Industry | नाशिक फिल्म इंडस्ट्री सुरू करणार : चिन्मय उदगीरकर

बाबाज्‌ थिएटरतर्फे एकांकिका स्पर्धांना प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकच्या रंगकर्मींमध्ये नेतृत्वाचे गुण आणि कलावंतांमध्ये कौशल्य असताना येथे फिल्म इंडस्ट्री सुरू झालेली नाही. त्यासाठी आपण पुढाकार घेत असून, कुठल्याही परिस्थितीत नाशिकमध्ये ही इंडस्ट्री आणायची आहे, अशी ग्वाही अभिनेता चिन्मय उदगीरकर याने दिली.

बाबाज्‌ थिएटरतर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित एकांकिका स्पर्धेचे उद्‌घाटन मंगळवारी (ता. १४) त्यांच्या हस्ते झाले. (chinmay udgirkar statement Nashik to start film industry nashik News)

या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी विजय साळवे, सावानाचे कार्याध्यक्ष गिरीश नातू, ज्येष्ठ रंगकर्मी मुकुंद कुलकर्णी, प्रवीण कांबळे, बाबाज्‌ थिएटरचे अध्यक्ष प्रशांत जुन्नरे उपस्थित होते. नवोदित कलाकारांना उद्देशून अभिनेता चिन्मय म्हणाला, नाशिकचे कलाकार सध्या राज्यातील मालिकांमध्ये प्रमुख भूमिकेत आहेत.

सगळे गाजवणारे कलावंत आहेत. त्यांच्याप्रमाणे नवोदित कलावंतांनी व्यावसायिक दृष्टिकोन त्यासोबतच नाट्यकला जोपासली पाहिजे. फक्त चमकोगिरी करण्याचे हे माध्यम नाही. याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असा सल्लाही त्याने दिला.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

नेता, अभिनेता होण्यापूर्वी आपण आईचा मुलगा आहोत. त्याप्रमाणे स्वतःच स्वतःवर नियंत्रण ठेवून वागले पाहिजे. तर एकविसाव्या शतकातील उत्तम कलाकार म्हणून तुमचा नावलौकिक होईल, असे चिन्मय म्हणाला.

नाट्यस्पर्धेच्या पहिल्या दिवशी सहा एकांकिका सादर झाल्या. यात नाट्य नम्रता संस्थेचे नारायणी, नाशिक जिल्हा लेखा व कोषागरे कर्मचारी पतसंस्थेचे तथास्तु, लाइट पेपर क्रिएशनचे लव्ह, ज्ञानदीप कलामंचाचे यासनी मायनी या सवे, वैभवदीप नाट्यसंस्थेचे प्रेम की यातना व मधुरा वूमनचे पाणीपुरी या एकांकिका सादर झाल्या.

आज नऊ एकांकिका

बाबाज थिएटरतर्फे आयोजित एकांकिका स्पर्धेत बुधवारी ता.१५ नऊ एकांकिका सादर होणार आहेत. यात शांतता खेळ सुरु आहे, बप्पो, सुसाईड बडी, डिस्चार्ज, मुलाखत, ब्लाइंड स्पेस, सिंदबादचा म्हातारा, पाझर या नाटकांचा समावेश आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ८.३० पर्यंत ही नाटके परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सादर होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT