BJP Chitra Wagh esakal
नाशिक

Chitra Wagh Conference | औरंगाबादचे नामकरण धर्मवीर संभाजीनगर करा : चित्रा वाघ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : छत्रपती संभाजीराजे यांच्या विषयीच्या वक्तव्यावरून वातावरण तापले असताना भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी औरंगाबाद शहराचे नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजीनगर असे करावे अशी मागणी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज धर्मवीर नाहीत असे केलेले वक्तव्य दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. (Chitra Wagh statement at press Conference about changing name of aurangabad to dharmveer sambhaji nagar nashik news)

राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून मुंबई नाका येथे भाजप महिला आघाडीतर्फे आज आंदोलन करण्यात आले, त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, वादग्रस्त विधाने करून वातावरणात तणाव निर्माण करण्याचे काम केले जात आहे.

राहुल गांधी यांनी सुद्धा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा एका रॅलीच्या माध्यमातून अवमान केला. छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्माच्या संरक्षणासाठी खूप काही केले आहे. असे असताना ते धर्मवीर नाहीत, असे अजित पवार यांच्यासारख्या प्रगल्भ नेत्याने वक्तव्य करणे योग्य नाही.

औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे होणारच आहे. शिंदे-फडणवीस सरकार यांच्याकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा होईलच. परंतु औरंगाबादचे नाव आता फक्त छत्रपती संभाजीनगर असे करू नका तर धर्मवीर संभाजीनगर करा अशी आपली मागणी राहील असे सौ वाघ म्हणाल्या.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

उर्फीचा नाच सहन करणार नाही

रस्त्यावर नाच करत उघडे- नागडे फिरणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. उर्फी जावेद ही बाई मला ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी तिचे थोबाड रंगविन असा इशारा त्यांनी दिला. आम्ही काय करतो हे ऊर्फीसारख्या बाईला सांगण्याची आवश्यकता नाही.

जो नाच रस्त्यावर चाललाय ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. व्यक्ती स्वातंत्र्य हा स्वैराचार नाही. मुंबईच्या रस्त्यावर नाच करता हे आम्ही खपवून घेणार नाही. या संदर्भात पोलिसात तक्रार केली आहे. त्याचा मी पाठपुरावा करत असल्याचे चित्र वाघ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT