After the unbearable heat of the day, a large crowd gathers in the Gandhi Lake area of ​​Godaghat after the evening to experience the cool atmosphere.
After the unbearable heat of the day, a large crowd gathers in the Gandhi Lake area of ​​Godaghat after the evening to experience the cool atmosphere. esakal
नाशिक

Nashik News : गांधी तलावाजवळ फुलली चौपाटी; ज्येष्ठांसह तरुणाईलाही पडतेय भुरळ!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दिवसभराच्या असह्य उकाड्यानंतर थंडगार वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी गोदाघाटावरील गांधी तलाव परिसरात सायंकाळनंतर मोठी गर्दी उसळत आहे. ज्येष्ठ, तरुणाईला येथील वातावरणाची भुरळ पडत असल्याचे दिसून येते. (Chowpatty flowered near Gandhi Lake Young people fascinated with seniors Nashik News)

एप्रिलच्या सुरवातीपासूनच उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसभराच्या कडकडीत उन्हावर उतारा म्हणून गोदाघाटावरील ‘चौपाटी’ चांगलीच बहरू लागली आहे. त्यातच गत आठवड्यापासून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदा खळाळून वाहत असल्याने घाटाच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.

सायंकाळनंतर गांधी तलाव परिसरात मोठी गर्दी उसळत आहे. अनेकजण पाण्यासोबत सेल्फीचाही आनंद घेत आहेत. तलावाजवळ भेळ, चायनीज, पाणीपुरी, आइस्क्रीमसह अन्य खाद्यपदार्थांच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर लागल्या आहेत.

या ठिकाणी भेळीसह अन्य चटकदार पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी उसळत आहे. कोरोनामुळे अन्य ठिकाणांसारखेच येथील व्यावसायिकांवर गत दोन वर्षे आर्थिक संकट ओढवले होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

परंतु आता येथील व्यवहार पूर्वपदावर आले असून, छोट्या व्यावसायिकांच्या अर्थकारणासही काही प्रमाणात बळकटी मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी मोठी गर्दी असते.

स्नानासाठी मोठी गर्दी

श्रीराम जन्मोत्सवापासून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तत्पूर्वी दोन महिने गोदापात्र कोरडे पडले होते. त्यामुळे सध्या गोदावरी खळाळून वाहत आहे.

त्यातच महापालिका प्रशासनाने होळकर पुलाच्या वरील बाजूने मोठ्या प्रमाणावर वाहून आलेली पानवेली हटविल्याने कित्येक दिवसानंतर नदीपात्रात स्वच्छ पाणी वाहत असून, गांधी तलावही तुडुंब भरला आहे. त्यामुळे गांधी तलावासह रामतीर्थावर स्नानासाठी तरुणांची गर्दी उसळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs PBKS : राजस्थान आज प्ले ऑफमध्ये जाणार की पंजाब देणार पराभवाचा धक्का... प्रीती झिंटाच्या संघाचा कर्णधार कोण?

RBI Monetary Policy: महागाईमुळे RBIची चिंता वाढली; तुमचा EMI कमी होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

माधवी राजे शिंदे काळाच्या पडद्याआड! केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य यांना मातृशोक, दिल्लीपासून मध्य प्रदेशात शोककळा

Nagpur Crime : कुलर कंपनीच्या मालकाची २० लाखांची फसवणूक ; व्यवस्थापकाने बनावट कुलर बनवून विकले

Praful Patel : जिरेटोपावरुन प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, अशी कोणतीही गोष्ट मनात...

SCROLL FOR NEXT