Various such items have entered the market for Christmas festival reference image. esakal
नाशिक

Christmas Festival : नाताळसाठी सजल्या बाजारपेठा; सजावटीच्या वस्तूंना मागणी!

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी (जि. नाशिक) : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळ सणासाठी शहरातील बाजारपेठ फुलली असून ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी पताका यासह सांताक्लॉजचे कपडे आणि वस्तू खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहे. शहरातील विविध भागात असणाऱ्या या दुकानांमध्ये नाताळ सणासाठी आवश्यक वस्तूंची रेलचेल बघायला मिळत आहे. (Christmas Festival Markets decorated for Christmas Decorative items in demand nashik news)

ख्रिश्चन धर्मीयांचा पवित्र सण असणाऱ्या नाताळची पर्वणी साधण्यासाठी बाजारपेठ सज्ज झाली असल्याचे चित्र आहे. ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी दुकानांमध्ये वस्तूंचे आकर्षक मांडणी करण्यात आली असून विशेषतः बच्चे कंपनीला आकर्षित करण्याकडे दुकानदारांचा कल आहे. याबरोबरच होली रीट, बेल्स, प्रभू येशू आणि मेरी यांच्या मूर्ती, सांताक्लॉजचे कपडे, चांदणी, खेळणी, सांताक्लॉजच मुखवटा, ख्रिसमस बॉल्स, ट्री आणि टोप्या खरेदीसाठी उत्साह दिसून येत आहे.

नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी ख्रिस्ती बांधवांकडून मिठाई, चॉकलेट आणि केकची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याने नाताळसाठी खास केक विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. याशिवाय कॉन्व्हेंट आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये नाताळ सणाचे सेलिब्रेशन साजरे होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह संचारला आहे. सांताक्लॉजचे मुखवटे, टोप्या खरेदीकडे विद्यार्थ्यांचा कल असून लाल आणि पांढऱ्या रंगसंगतीच्या पेहरावाला अधिक मागणी आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

या वस्तूंची रेलचेल

घर आणि चर्चच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंसह चांदणी, बॉल्स, हँगिंग बेल्स, सांताक्लॉज कापडी आणि लाइट असलेली टोपी, ख्रिसमस ट्री, प्रभू येशू आणि मेरी मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याबरोबरच मेरी ख्रिसमसचे स्टीकर, विविध आकारांतील बेल, विविध रंगी स्टार, घरामध्ये व अंगणात मांडण्यासाठी आकर्षक ख्रिसमस ट्री, विद्युत माळा. अशा ख्रिसमस स्पेशल साहित्याने बाजारपेठ सजली आहे. यासह शहरातील चर्च सजविण्यात येत आहे. यामुळे शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT