Bishop Lourdes Daniel : Interfaith gathering at Holy Cross Church esakal
नाशिक

Nashik Christmas Natal : शांतता, एकोपा, प्रेम तारेल जगाला

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रत्‍येक व्‍यक्‍तीमध्ये देव असून, दोषांचे उच्चाटन करताना माणुसकी जागविण्याची आवश्‍यकता आहे. शांतता, एकोपा व प्रेम ही त्रिसूत्री जगाला तारणार आहे, असे प्रतिपादन बिशप लुर्डस डॅनियल यांनी रविवारी (ता. २५) केले.

त्र्यंबक नाका सिग्‍नल येथील होलीक्रॉस चर्च येथे भारतीय एकात्‍मता समिती आणि चर्च यांच्‍यातर्फे आयोजित सर्वधर्मीय नाताळ मेळाव्‍याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी ज्‍येष्ठ साहित्‍यिक उत्तम कांबळे, भारतीय एकात्‍मता समितीचे कार्याध्यक्ष जे. पी. जाधव, सचिव दिलीपसिंग बेनिवाल, सत्‍यनारायण पांडे, होलीक्रॉस चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर विजय गोन्‍सालवीस यांच्‍यासह भास्‍कर सावकार, यमुना अवकाळे, भारती जाधव आदी उपस्‍थित होते.(christmas natal celebration in nashik holy cross church nashik news)

कार्यक्रमाच्‍या सुरवातीला नाताळ गीतांचे सादरीकरण झाले. यानंतर मैत्री पत्रिका या पुस्‍तिकेचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रकाशन झाले. पुस्‍तिकेविषयी फादर विजय गोन्‍सालवीस यांनी माहिती दिली. त्‍यानंतर सृष्टीरक्षक पुरस्‍कारांचे वितरण झाले. निमंत्रक पवन जोशी, कार्यवाह फ्रान्‍सिस वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.

संघर्ष टाळण्यासाठी प्रेम हाच उपाय : कांबळे

सध्या माणसामाणसांत त्‍याप्रमाणे धर्म, जाती, पंथात संघर्ष निर्माण झालेला असून, संपूर्ण जग या संघर्षाला तोंड देत आहे. माणसातील प्रेम कमी होऊ लागल्‍याने संघर्ष निर्माण झालेला आहे. त्‍यामुळे हा संघर्ष केवळ प्रेमातूनच टाळला जाऊ शकतो, असे मत ज्‍येष्ठ साहित्‍यिक उत्तम कांबळे यांनी व्‍यक्‍त केले.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

सृष्टीरक्षक पुरस्‍कारार्थी

शकुंतला भोये (वनरक्षक कुळवंड, हरसूल), राजश्री देशमुख (वनरक्षक (राजबारी, पेठ), हेमराज गावित (वनरक्षक, बार्हे, सुरगाणा), देवीदास चौधरी (वनौषधीतज्‍ज्ञ, वडमाळ, सुरगाणा) यांना पुरस्‍कार प्रदान करण्यात आला. त्र्यंबकेश्‍वरचे वन परिमंडळ अधिकारी अरुण निंबेकर कर्तव्‍य बजावत असल्‍याने त्‍यांचा पुरस्‍कार त्‍यांच्‍या पत्‍नी पुष्पा निंबेकर यांनी स्‍वीकारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Clouds Arabian Sea : मॉन्सूनची चाहूल! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर मोठे ढग तयार; मुंबईसह उपनगरांत पावसाला सुरूवात

मंदार चांदवडकर नाही तर तारक मेहतामधील भिडे गुरुजीच्या भूमिकेसाठी 'या' मराठी अभिनेत्याला मिळाली ऑफर !

आनंदवार्ता! वाघ संवर्धनाला नवी चालना; ताडोबातील 'झिनत' ने ओडिशात दिला चार शावकांना जन्म

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावामुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वाढले?

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलात भावात 7% वाढ झाल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू! पाहा तुमच्या जिल्ह्यातील ताजे दर

SCROLL FOR NEXT