eknath_khadse.jpg 
नाशिक

सिडकोत एकनाथ खडसे गट सक्रीय? 'राष्ट्रवादी' प्रवेशाच्या चर्चेला उधाण

प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक : काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील चर्चेला उधाण आल्याने भाजपमध्ये अद्याप कुठली प्रतिक्रिया उमटली नाही व स्वत: खडसे यांनीदेखील या चर्चेला अर्थ नसल्याचे सांगितले असले, तरी खडसे यांच्याबरोबर १२ ते १५ आमदार जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर खानदेशी नागरिकांचा वरचष्मा असलेल्या शहरातील सिडको भागातील कोणते व किती पदाधिकारी त्यांच्या गळाला लागतील, याची चर्चा जोरात आहे.

खानदेशी नेत्यांचा प्रभाव स्पष्ट

सिडको परिसर हा खानदेश बहुल आहे. या भागात बहुतांशी नागरिक हे धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांतील आहेत. त्यामुळे महापालिका, विधानसभा असो वा लोकसभा कोणत्याही निवडणूकीत येथे प्रचारसभा घेताना जळगावच्या नेत्यांना आवर्जून आणि आग्रहाचे आमंत्रण दिले जाते. घरोघर देखील अहिराणी भाषेतील प्रचार होतो. या नेत्याचे अस्सल अहिराणी भाषण ऐकण्यासाठी नागरिकही तेव्हढ्याच उत्साहाने जमतात. त्यामुळेच महापालिका निवडणुकीत उमेदवारीचा विचार करतांना खान्देश पट्ट्यातील नेत्यांना अधिक प्राधान्य देतात. नुकतेच सहा महिन्यापूर्वी सिडकोतील महापालिका पोटनिवडणुकीत सभा घेण्यासाठी खास जळगावच्या बड्या नेत्याला आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या एका सभेने तो उमेदवार निवडून आल्याचे सांगण्यात येते. यावरून या भागात खानदेशी नेत्यांचा किती प्रभाव आहे, हे दिसून येते. 

व्यक्तीगत स्तरावर कमालीची गुप्तता

गेल्या काही दिवसांपासून खान्देश पट्ट्यातील अन्‌ राज्यातील भाजपचे मोठे नेते अशी ओळख असलेले एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आले. यासंदर्भात अनौपचारीक चर्चा व तयारीही झाल्याचे बोलले जाते. त्यादृष्टीने जळगाव जिल्ह्यातील राजकारणावर खडसेंच्या राजकीय निर्णयाचा परिणाम होईल. तसाच जळगावशी संलग्न असलेल्या नाशिकच्या राजकारणावर देखील त्याचा परिणाम होणार आहे. विशेषतः नाशिक शहरातील सिडको विभागात सध्या भाजपचा वरचष्मा आहे. येथील काही नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते खडसेंच्या गळाला लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येते. अशा राजकीय चर्चांना सध्या सिडको भागात उधाण आले आहे. मात्र याबाबत व्यक्तीगत स्तरावर कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. 

खडसे गट सक्रीयचे चिन्ह

सिडको परिसरात भाजपच्या नगरसेवकांमध्ये प्रतिभा पवार, अलका अहिरे, छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, कावेरी घुगे, मुकेश शहाणे, निलेश ठाकरे, राकेश दोंदे या खान्देशच्या मातीशी संपर्क असलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे. यातील काही माजी मंत्री गिरीश महाजन यांना माननारे आहेत. एकनाथ खडसे यांच्या संपर्कात देखील आहेत. हे नगरसेवक काय भूमिका घेतात, हे भविष्यातच ठरेल. मात्र यानिमित्ताने खडसे गट सक्रीय झाला आहे, हे नक्की. 

भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत राजकारणाचा बळी ठरलेले ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षात नाराज आहेत. ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. यासंदर्भात कोणीही उघड प्रतिक्रीया व्यक्त केलेली नाही. मात्र स्थानिक राजकारणात कोंडी झालेल्यांना ही राजकीय उभारीची संधी ठरण्याची शक्‍यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT