road divider 
नाशिक

सुशोभीकरणाचा निधी गेला कुठे? पंचवटी परिसरवासीयांचा सवाल 

योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : प्रशासनाने शहरात येणाऱ्या मुख्य मार्गांवर असलेले दुभाजक सुशोभित करण्याकामी निधी खर्च केला होता. मात्र, पंचवटीत प्रवेश करताच दुभाजकांची स्थिती बघता, केलेला खर्च वाया गेल्याचे चित्र दिसत आहे. स्मार्टसिटींतर्गत नाशिक शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. यात शहर सुशोभित दिसावे हा मानस आहे. 

दुभजकांची अवस्था वाईट

नाशिक शहर प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी अशी ओळख आहे. पंचवटी भागात रामकुंड, गोदाघाट परिसर, काळाराम मंदिर, सीतागुंफा, तपोवन भागात परजिल्हा, तसेच परराज्यातून भक्त भाविक येत असतात. शहराच्या सौंदर्यात भर पडावी, यासाठी येणाऱ्या मार्गावर दुभाजक बसविण्यात आले आहेत; परंतु आता गुजरात, सुरत महामार्ग दिंडोरी नाका ते चित्रकूटपर्यंत असलेल्या दुभाजकात कचरा, पालेभाज्या टाकलेल्या आहेत. तसेच भिकाऱ्यांचे वास्तव्य आहे. पेठ फाटा ते फुलेनगरच्या पाटापर्यंत लोखंडी दुभाजक असून, बऱ्याच ठिकाणी तुटलेले आहेत. काही ठिकाणी दुभाजक गायब अशी स्थिती आहे. औरंगाबाद नाक्यापासून रोडवर असलेले दुभाजक तुटलेले व गायब अशी स्थिती आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

पंचवटी पुण्य पावन भूमी आहे. या ठिकाणी परराज्यातून येणाऱ्या भक्त भाविकास तुटलेले दुभाजक व दुभाजकावर भिकाऱ्यांचे वास्तव्य बघावयास मिळते. तसेच पेठ रोड, फुलेनगर व दिंडोरी रोड जागोजागी पडलेला कचरा यामुळे नाशिक शहराचे नाव खराब होते. 
-हर्शल पवार, नागरिक 

औरंगाबाद रोडहून येताना बऱ्याच ठिकाणी गायब असलेले दुभाजक यामुळे शहर विद्रूपीकरणामध्ये भर पडते. शहराची वाटचाल स्मार्टसिटीकडे सुरू असून, या समस्येकडे महापालिका प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. स्टील, लोखंडी जाळीऐवजी दुभाजकाचे बांधकाम करून त्यात सुशोभित वृक्षारोपण केले, तर येणाऱ्या अभ्यागतांना नवीन दर्शन होईल. 
-नितीन निमसे, नागरिक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

Cutlet Paratha: एकदा बनवाल तर घरच्यांची फर्माईश ठरलेली! असा बनवा स्वादिष्ट कटलेट पराठा

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

अस्थिबोध : अवघड शस्त्रक्रिया; पण नियोजन अचूक!

SCROLL FOR NEXT