gulmohar tree esakal
नाशिक

Nashik News :...अन् चक्क गुलमोहराच्या झाडातून निघू लागलं पाणी!

दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : वणी नाशिक रस्त्यावरीस ओझरखेड कॉलनी जवळील गुलमोहरांच्या झाडातून अखंड पाणी वाहात असल्याने पाणी पाहाण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागल्याने तर्क- विर्तकांना उधाण आले आहे.. (citizens flock to see continuous water flows from Gulmohar tree near Ozarkhed Colony nashik news)

लखमापुर फाट्यापासून काही आंतरावर असलेली ओझरखेड कॉलनी जवळ रस्त्यांच्या कडेला एक गुलमोहरांचे झाड असुन त्या झाडांच्या बरोबर मध्य भागातून पाण्याचा झरा वाहु लागल्याने नागरिकांनी पाणी वाहाते ही खबर कळतांच पाणी पाहाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहे. व झाडांतुन वाहाणा-या पाण्यांविषयी नागरिकांमध्ये चर्चेला एकप्रकारे उधाण आले आहे. नाशिक वणी सापूतारा, सप्तशृंगी गड महामार्गावर हा भाग येत असल्याने वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे ही बातमी वा-यासारखी परिसरात समजताच पाणी

पाहाण्यासाठी एक प्रकारे यात्रांच भरली. त्यामुळे अनेकांनी वेगवेगळ्या विचारांची उधळण केली. याबाबत मिळालेली माहिती अशी की हैं झाडांवर या जागेवर लावण्या अगोदर तेथून जमिनीतुन पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे. काही कालांतराने या जागेवर हे गुलमोहर झाडांचे रोपन करण्यात आले.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

जसजसे हे झाड मोठमोठे होऊ लागले तसेतसे झाडाच्या मुळ्या जमिनीत जाऊ लागल्याने त्या पाईप लाईनला छेदत गेल्याने त्या मुळ्यांनी पाईपलाईन काही प्रमाणात तुटल्याने त्या पाण्यांला अन्य ठिकाणी मार्ग न मिळालेल्याने ते मुळी व्दारे झाडाच्या खोडांतुन ते पाणी झाडांतुन बाहेर पडत आहे. असे स्थानिक शेतकरी बांधवांनी सांगितले आहे. असे असले तरी काही नागरिकांनी झाडातून निघत असलेले पाणी श्रध्देपोटी बाटलीत भरुन नेत असल्याचे दिसले.

"नागरिकांनी अफावांवर विश्वास न ठेवता, कुठेतरी पाईपलाईन तुटल्याने पाण्याला अन्य ठिकाणाहून जागा न मिळाल्याने ते पाणी मुळीव्दारे झाडांच्या खोडांतुन बाहेर पडत आहे. हे गुलमोहरांचे झाड जीर्ण स्वरूपांचे आहे. म्हणून पाण्यांचा प्रवाह त्यातुन वाहात आहे. तरी नागरिकांनी अफावांवर विश्वास ठेवु नये." - धनराज महाले, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT