Sakal
Sakal Sakal
नाशिक

कुणी कामही देत नाही अन् भिकही…लॉकडाउनमुळे तृतीयपंथीयांचे हाल

उत्तम गोसावी

ओझर (जि. नाशिक) : तृतीयपंथी म्हटले की, बहुसंख्य तिरस्कारातूनच त्यांच्याकडे पाहतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसांप्रमाणे त्यांना वागणूक मिळत नाही. कुणी कामही देत नाही. परिणामी, इच्छा नसतानाही तृतीयपंथीयांना भिक मागावे लागते. पण, सध्या लॉकडाउनमुळे बाजारपेठ ठप्प आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांना कुणी भिकही देत नसल्याचे चित्र आहे. (Citizens in transgender communities face difficulties due to lockdowns)

डॉ. अर्चना पठारे यांनी फुलवले हास्य

अनेक तृतीयपंथीयांकडे आधारकार्ड, रेशनकार्ड नाही. त्यामुळे त्यांना स्वस्त धान्य दुकानातून रेशनही मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भातील त्यांची अडचण ओझरचे सामाजिक कार्यकर्ते भावेश मंडलिक यांनी निफाडच्या प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांना फोन करून त्यांच्या घरातील धान्य संपले असून काही मदत होऊ शकते का? अशी विचारणा केली. त्या वेळी अधिकाऱ्यातील माणूस जागा झाला. आपण अधिकारी असून प्रशासनाच्या पद्धतीने आम्ही काय करू शकतो, असे उत्तर न देता अवघ्या काही तासांत किराणा व धान्य पाठवून दिले. त्यामुळे अशा कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. या कार्यामुळे अधिकाऱ्यांप्रति नागरिकांचा मोठा विश्वास निर्माण होत आहे.

ओझरसह राज्यातील तृतियपंथीयांना शिधापत्रिका दिली तर किमान जेवणाची तरी सोय होईल. सततचे लॉकडाउन पाहता शाश्वत मदत हवी आहे. शासनाने आधार नोंदणी आणि अंत्योदय शिधापत्रिका द्यावी. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून तृतिपंथीयांना धान्य मिळेल.

- भावेश मंडलिक, सामाजिक कार्यकर्ते, ओझर

आम्हीही माणूस आहोत. आम्हालाही भाव-भावना आहेत. भिक मागून जगणे आम्हालाही आवडत नाही. डॉ. अर्चना पठारे यांनी अडचणीत केलेली मदत न विसरता येणारी आहे.

- हेमा जाधव, तृतीयपंथी, ओझर

संबंधित तृतीयपंथीयांची माहिती घेऊन लवकरच रेशनकार्डसह शासनाची असलेली योजना राबविण्यात येईल.

- डॉ अर्चना पठारे, प्रांताधिकारी, निफाड

(Citizens in transgender communities face difficulties due to lockdowns)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT