Abhona Vaccination
Abhona Vaccination Sakal
नाशिक

आदिवासी म्हणतात, लसीकरण नकोच! आरोग्य विभागीची डोकेदुखी मात्र वाढली

किरण सुर्यवंशी

अभोणा (जि. नाशिक) : कोरोना प्रतिबंधक लसींचा सर्वत्र तुटवडा जाणवत असताना आदिवासी भागात (tribal areas) नागरिकांच्या उदासीनतेमुळे लसीकरणासाठी (Vaccination) अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने उरलेल्या लसी नाइलाजास्तव इतर तालुक्यांना वर्ग कराव्या लागत आहेत. त्यामुळे मागील सरासरी बघून होणाऱ्या लसींचा पुरवठा खूप कमी असल्याने परिसरातील सुशिक्षित नागरिकांना मात्र लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. (Citizens in tribal areas do not respond well to corona vaccination In Nashik District)

आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली

४५ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणाचेच उद्दिष्ट अद्याप पूर्ण होत नाही. त्यामुळे १८ वर्षांपुढील लसीकरण करणेही कठीण झाल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. त्यातही प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी फक्त १०० लसींचा मर्यादित पुरवठा होत असल्याने त्या गावातील नागरिकांनाच प्राधान्याने लस देण्याची मागणी संबंधित गावातील नागरिकांकडून होत आहे, तर उर्वरित नागरिकांना लसीची वाट बघावी लागत आहे. मुळातच जिल्हा रुग्णालयाकडून खूप कमी प्रमाणात लसींचा पुरवठा होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. ज्या आदिवासी गावात मृत्यूची संख्या वाढली आहे, त्या गावात लसीकरणासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर अरेरावी, दमदाटी करून परत पाठवले जाते, तर काही गावांत बॅनर फाडून, आरोग्य कर्मचाऱ्यांना बघून दार बंद केले जाते. आरोग्य तपासणीसाठीसुद्धा विरोध केला जात असल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे.

सध्या नांदुरी येथे लसीकरण सुरू असून, लसींचा जसजसा पुरवठा होईल तसतसे अभोणा व इतर आरोग्य केंद्रात लसीकरण होईल, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

Citizens in tribal areas do not respond well to corona vaccination In Nashik District

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT