nandgaon esakal
नाशिक

नांदगावात 'त्या' अफवेने नागरिकांची धावपळ! शेतकरी तणावाखाली

संजीव निकम

नांदगाव (जि.नाशिक) : पाण्याची पातळी कमी झाल्यावर पूरस्थिती नियंत्रणात आली. गुरूवारी (ता.९) शहरातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरु होते. एकीकडे पुरातून उद्भवलेल्या परिस्थितीतुन सावरण्याचे प्रयत्न सुरु असताना अचानक एक बातमी आली. आणि साऱ्या नागरिकांची धावपळ झाली...काय घडले नेमके?

नांदगावात 'त्या' अफवेने नागरिकांची एकच पळापळ

अचानक लेंडी नदीपत्रावर असलेले पालिकेच्या मालकीचे दहेगाव धरण फुटल्याच्या अफवेने शहरवासीय विशेषतः नदीपात्रालगत च्या नागरी वसाहती व्यवसायिक शेतकरी कमालीचे तणावाखाली खाली आले. त्यातच सोशल मीडियावर अफवांवर विश्वास ठेवू नये या आव्हानांमुळे संभ्रम दूर होण्याऐवजी गोंधळात भरच पडत गेली. शेवटी पाटबंधारे व पालिकेच्या वतीने प्रकटन जाहीर झाले व अफवेवर पडदा पडला. मात्र या अफवेने गुरुवारी भरणाऱ्या बैलबाजारात अफरातफर पसरून एकच धावपळ उडाली. बैलांच्या खरेदी विक्रीसाठी आलेली वाहने व बैलांना सोबत घेऊन वाट मिळेल त्यादिशेने पळापळ सुरु झाली. बाजार समितीच्या आवारातच हा गोंधळ उडाल्याचे बघून समितीचे सचिव अमोलखैरनार व बाबासाहेब साठे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पळापळ करणाऱ्यांची समजूत काढली. तर दुसरीकडे नदीपात्रा लगतच्या घरातील मंडळी सुरक्षित आसरा म्हणून गच्चीवर जाऊन थांबले.

पुरामुळे विविध रस्त्यावर साचलेला गाळ व मलबा हटविण्यासाठी पालिकेच्या वतीने कामाला सुरुवात झाली. पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची घरे पुरात सापडल्याने त्यांच्या समोर अगोदरच संकट उभे असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहर स्वच्छतेसाठी येवला येथील पालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कामगारांची मदत घेतली. येवला येथून आलेल्या या कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी साचलेला गाळ कचरा व मलब्याचे ढिगारे दूर करण्याचे ककाम केले रस्त्यांवरचा गाळ काढण्यासाठी मनमाड पालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे काम सुरूच होते. पालिकेने नदीपात्रालगत च्या रहिवाशांसाठी गुप्ता लॉन्स मध्ये दोन वेळच्या भोजनसह निवास व्यवस्था करूनही नागरिक फिरकत नसल्याने आता त्यासाठी जेथे आहे त्या ठिकाणीच दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था उद्यापासून अमलात येणार आहे. दरम्यान दुसरीकडे आमदार सुहास कांदे यांच्या निर्देशानंतर आजपासून पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली. त्यासाठी प्रभारी तहसीलदार दीपक पाटील यांनी पंचनाम्यासाठी एकूण पाच पथके नियुक्त करण्यात आली असून त्यात अतिक्रमित बिगर अतिक्रमित अशा पंचनाम्याचे नोंदणीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून आपला अहवाल तहसीलदारांना सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज जवळपास चारशेच्या आसपास पंचनामे करण्यात आले. सर्व पंचनामे पूर्ण करण्यासाठी अजून तीन दिवस लागणार आहेत.

नागरिकांचा जीव मुठित घेऊन प्रवास

दरम्यान मध्य रेल्वेचे भुसावळचे मंडळ महाप्रबंधकएस एस केवडीया यांनी लेंडी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलासह नव्या सबवेल भेट पाहणी केली त्यांच्या समोरच रुळांवरून मोठ्या संख्यने मार्गक्रमण करीत असलेल्या नागरिकांची अवस्था त्यांना लाखो देखा बघावयास मिळाली. मात्र रेल्वेच्या आरपीएफ मंडळींनी नागरिकांना कुणालाही त्यांच्याजवळ जाऊ दिले नाही. त्यामुळे नागरिकांना आपले गाऱ्हाणे मांडण्याची मिळाली नाही. तथापि लेंडी नदीतून अद्यापही पूरपाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने चांडक प्लॉट गांधीनगर भागातील रहिवाशांना रेल्वे रूळ ओलांडून जीव धोक्यात घालून जावे लागते आहे. तर येवला औरंगाबाद रस्त्याकडे नागरी वसाहतीमधील रहिवाशांना जाण्यासाठी जाण्यासाठी मार्ग नसल्याने त्यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT