file photo liquor bottle esakal
नाशिक

Nashik News : नागरिक त्रस्त; उद्यान विभाग सुस्त!

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : परिसरातील माऊली लॉन्सजवळ असलेले मुरारीनगर उद्यान समस्यांच्या गर्तेत असून, स्वामी समर्थ गुरुपीठ असलेल्या या उद्यानात लहान मुलांना शारीरिक खेळांसोबत अध्यात्माची साथ मिळत असते. मात्र दुसरीकडे रात्रीच्या काळोख्यात येथे मद्यपींच्या ओल्या पार्ट्यांची झिंग असल्याचे वास्तवादी चित्र येथे पाहावयास मिळत आहे. (Citizens suffering by drunkards at night in parks Nashik News)

मुरारीनगर उद्यानात बसविण्यात आलेल्या खेळण्यांची मोडतोड झालेली असून, उद्यानात मोठ्या स्वरूपात कचऱ्याचे साम्राज्य देखील पसरलेले आहे. सफाई केल्यानंतर हा कचरा येथे उद्यानातच जाळण्यात येत असून, मानपा कर्मचारी कचरा उचलून नेण्याची तसदी घेत नाहीत.

उद्यानाचा आवार मोठा असल्याने उद्यानात अनेक सिडकोवासीय येतात, तर देवदर्शनाकरिता देखील सकाळ, सायंकाळ भाविक येत असतात. परंतु अशा पवित्र वास्तूच्या ठिकाणी मद्यपी देखील त्यांचा डाव साधून घेत असतात. उद्यानात मोठ्या प्रमाणावर असलेल्या रिकाम्या मद्याच्या बाटल्या याबाबी स्पष्ट करत आहेत. तर याच उद्यानात गावागुंडांच्या तलवारी देखील सापडल्या असल्याची माहिती स्थानिक नागरिकांमधून देण्यात आली आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

या परिसरामध्ये गावगुंडांच्या भीतीमुळे की अनामिक भीतीमुळे येथील स्थानिक रहिवासी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत असून, आम्ही प्रतिक्रिया दिल्यास आम्हास त्या बाबीचा त्रास होऊ शकेल, अशा भीतीपोटी नागरिक समोर येत नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

- उद्यानातील खेळण्यांची मोडतोड झालेली आहे
- मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य
- गावागुंडांची दहशत
- मनपा प्रशासनाची उद्यानाकडे पाठ
- मद्यपींचा सर्रास वावर
- उघड्यावर कचरा जळण्याचा प्रकार
- उद्यानात या आधी तलवारी सापडल्याचा प्रकारदेखील घडला आहे
- रहिवासीयांमध्ये अनामिक भीतीचे सावट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॉकपिटमध्ये चाकू हल्ला, विमान वेगाने खाली आलं... तरी १७४ जणांचे प्राण वाचवणारे स्मित मच्छार कोण? साहस पाहून नेतान्याहू, ट्रम्पही शॉक

LPG Cylinder Price Hike : सणासुदीच्या तोंडावर महागाईचा झटका! कमर्शियल LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Nuchinunde Recipe: इडली-वडा तर नेहमीच खाता; ट्राय करा कर्नाटकचं स्पेशल, प्रोटीनने भरपूर 'नुचिनुंडे'!

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

SCROLL FOR NEXT