Nashik Crime News
Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : शहर पोलिसांकडून 61 किलो गांजा हस्तगत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात गांजा विक्री करणाऱ्यासाठी आलेल्या दोघांना आडगाव शिवारात सापळा रचून अटक करण्यात आली. संशयितांकडून ६१. १४० किलो गांजासह दोन कार असा साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने केली. (City police seized 61 kg of ganja at adgaon area 2 arrested Nashik Latest Crime News)

रशीद गुलाब मन्सूरी (४२, रा. माळी गल्ली, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक), प्रीतिश आनंदा जाधव (३१, रा. जाधव मळा, जकात नाकामागे, आडगाव शिवार, नाशिक), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. शहर गुन्हे शाखा युनिट एकचे अंमलदार विशाल देवरे यांना आडगाव शिवारात दोन संशयित गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली होती.

त्याची माहिती युनिट एकचे निरीक्षक विजय ढमाळ यांना दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव शिवारातील जाधव मळा परिसरात सापळा रचला. या वेळी जकात नाक्याच्या मागे असलेल्या जाधव मळ्यात संशयित हे दोघे कारमध्ये (एमएच- ४६- एक्स- ५०५२) असलेला गांजा वॅगेनार कारमध्ये (एमएच ०२ बीडी ९०५२) ठेवत होते. दबा धरून असलेल्या पथकाने छापा टाकत दोघा संशयितांना ताब्यात घेतले.

तसेच घटनास्थळावरून १४ किलो १४० ग्रॅम गांजा व दोन कार, दोन मोबाईल असा १४ लाख ५३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कामगिरी युनिट एकचे उपनिरीक्षक विष्णू उगले, सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागूल, किरण शिरसाट, प्रवीण कोकाटे, नाजीम पठाण, प्रदीप म्हसदे, योगीराज गायकवाड, शरद सोनवणे यांनी बजावली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT