City Police Zero Tolerance Operation Combing operation kills 565 defectors esakal
नाशिक

Nashik Police: शहर पोलिसांचे ‘झिरो टॉलरन्स’ ऑपरेशन! कोंम्बिंग ऑपरेशनचा 565 टवाळखोरांना दणका

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आठवड्याच्या प्रारंभी सलग दोन दिवस दोन खुनाच्या घटनांनी शहर हादरले असतानाच, शहर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले.

मंगळवारी (ता.२८) आयुक्तालय हद्दीमध्ये अचानक कोम्बिंग आणि ऑल आऊट ऑपरेशन राबवून पोलिसांनी ५६५ मद्यपी, रोडरोमिओंविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली.

शहर पोलिसांच्या झिरो टॉलरन्स ऑपरेशनमुळे टवाळखोरांचे धाबे दणाणले आहे. (City Police Zero Tolerance Operation Combing operation troubled 565 Criminals nashik)

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार घेताच रविवारी आणि सोमवारी या दिवशी एकापाठोपाठ एक असे दोन खुनाच्या घटना घडल्या.

त्यामुळे पोलीस आयुक्तांंनी मंगळवारी (ता.२८) रात्री सात ते अकरा वाजेदरम्यान आयुक्तालय हद्दीमध्ये कोम्बिंग ऑल आऊट ऑपरेशन राबविले.

या कारवाईमध्ये परिमंडळ एक आणि दोनमध्ये पोलीस ठाणेनिहाय धडक कारवाई करीत रस्त्यालगत टवाळके करणारे, मद्याच्या दुकानांबाहेरील मदयपी, रोडरोमीओंसह भरधाव वेगात दुचाक्या चालविणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला.

परिमंडळ एकमधील आडगाव, पंचवटी, म्हसरुळ, भद्रकाली, सरकारवाडा, मुंबई नाका आणि गंगापूर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३१७ तर, परिमंडळ दोनमधील सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्याच्या हददीतून २४८ टवाळखोरांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

तसेच, ३५ जणांविरोधात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्याप्रकरणी कोटपाअन्वये दंडात्मक कारवाई केली.

या कारवाईमध्ये शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह सहायक आयुक्त, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. पोलिसांच्या या कारवाईमुळे टवाळखोरांचे धाबे दणाणले आहे.

टवाळखोरांच्या नोंदी

शहरात ‘झिरो टॉलरन्स’ राहण्यासाठी पोलीसांनी टवाळखोरांविरोधात कारवाई केली. पोलीसनिहाय केलेल्या या कारवाईत टवाळखोरांच्या नावासह पत्ता, त्याचा व्यवसायासह इत्यंभूत माहितीच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत.

त्यामुळे भविष्यात गुन्हेगारी घटना घडल्यास यांच्यातील संशयित असल्यास त्याची तात्काळ माहिती पोलीसांना मिळू शकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver News : सोने चांदी आणखी उतरणार? महिन्याची सुरूवात दरातील घसरणीने, जाणून घ्या आठवड्यातील दर

US Iran Tensions : मध्यपूर्वेतील युद्धाचे संकट टळले ! अमेरिकेने इराणवरील हल्ले तूर्तास थांबवले; डोनाल्ड ट्रम्प यांनी का घेतला निर्णय?

मला दुसरं आयुष्य मिळालं, माफ केलं ही खूप मोठी गोष्ट; PM मोदींनी माफ करताच विद्यार्थीनीचा नवा VIDEO

Mumbai Rain: धरण क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी, मुंबईचा पाणीसाठा ९० टक्क्यांच्या उंबरठ्यावर; सध्याची आकडेवारी किती?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींनी 'अंमली पदार्थमुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियान' केले सुरू

SCROLL FOR NEXT