crime esakal
नाशिक

Nashik News : पिंपळगाव बसवंतमध्ये गुन्हेगारांची थर्टी फस्ट; तपास मात्र झिंगलेला

शहरात वर्षभरात गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली दिसली. गुन्हेगारांनीच थर्टी फस्ट साजरा केल्याचे आणि पोलिसांचा तपास झिंगलेला राहिल्याचे दिसून आले.

एस.डी. अहिरे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरात वर्षभरात गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली दिसली. गुन्हेगारांनीच थर्टी फस्ट साजरा केल्याचे आणि पोलिसांचा तपास झिंगलेला राहिल्याचे दिसून आले.

यात चोरी, घरफोडी, वाहन चोरी, महिलांवरील अत्याचार, अशा गुन्ह्यांचे प्रकार वाढलेले दिसले.(city saw huge increase in crime rate during year nashik news )

गंभीर बाब म्हणजे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयात प्रकरण निकाली निघून शिक्षेच्या प्रमाणातही यंदा घट झाली आहे. पिंपळगाव पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांच्या तुलनेत यंदा विविध गंभीर गुन्ह्यात वाढ झाली. एटीएम, घरफोडी, खून यासारखे गंभीर गुन्हे घडले. काही गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले, पण बहुतांश गुन्ह्याचा तपास वर्ष उलटले, तरीही सुरू आहे.

महिलांविषयी गुन्ह्यात वाढ

यंदा महिलांविषयी गुन्ह्यात वाढ झाली. यात कौटुंबीक छळ, छेडछाड, विनयभंग, बलात्कार, असे २९ गुन्हे पिंपळगाव पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वर्षभरात घडले.

अपुऱ्या पोलिस बळाचा प्रश्‍न

गुन्ह्यात वाढ झाल्याने पिंपळगांव पोलीस प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर प्रश्‍न चिन्ह उभे राहु शकते.पण यात रिक्त पदाचे ग्रहण हि सर्वांधीक उणी बाजु दिसत आहे.चार पोलीस अधिकार्याची पदे रिक्त आहे.पण त्यातील तीनच कार्यरत आहे.तर 55 पोलीस कर्मचार्याची पदे मंजुर असुन 39 पदे भरलेली आहे.

59 पैकी 43 पदे भरलेली असुन 16 पदावर नियुक्त्या दिल्या गेलेल्या नाहीत.त्यामुळे पिंपळगांव बसवंत शहरासारखी जिल्ह्यातील सर्वाधीक मोठी बाजारपेठेचे शहर,परिसरातील वीस गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची धुरा पिंपळगांव पोलीसांवर आहे.तब्बल सव्वा लाख लोकसंख्येचा भार 43 पोलीस अधिकारी व कर्मचार्याच्या खांद्यावर आहे.अपुर्या मनुष्यबळामुळे चोराचे फावते आहे.

गुन्हे व संख्या : एटीएम, घरफोडी, चोरी-४७, महिला (कौटुंबीक छळ, विनयभंग)- २४, बलात्कार-५

''शहर व परिसरातील चोरी, घरफोडी, वाहनचोरी गुन्हे वर्षभरात घडले. त्यातील काही उघड करून संशयित जेरबंद केले, तर काहींचा तपास सुरू आहे. गुन्हे उघडण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करीत आहोत.''-अशोक पवार, पोलिस निरीक्षक, पिंपळगाव बसवंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maya Kulkarni Death : कोल्हापूर महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याचा गाव तलावात आढळला मृतदेह; मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

Pune Fire Safety: पुण्यात अग्निसुरक्षेचा बडगा; नियमभंग करणाऱ्या ४४७ आस्थापनांना नोटिसा, आठ दिवसांत यंत्रणा उभारण्याचे आदेश

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

SCROLL FOR NEXT