Citylinc news esakal
नाशिक

Citylinc Rate Hike : आजपासून सिटीलिंककडून बस भाडेवाढ लागू

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (सिटीलिंक) कडून १५ फेब्रुवारीपासून भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.

भाडेवाढीमुळे काही प्रमाणात सिटीलिंक (Citylinc) कंपनीचा तोटा भरून निघणार असला तरी सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र झळ बसणार आहे.(Citylink bus has implemented fare hike from midnight of February 15 nashik news)

महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून जुलै २०२१ पासून शहर आणि लगतच्या २० किलोमीटर लांबीपर्यंतच्या ग्रामीण भागात ‘सिटीलिंक-कनेक्टिंग नाशिक’ बससेवा चालविली जाते.

सद्यःस्थितीत ही बससेवा तोट्यात असली तरी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचे सक्षमीकरण आणि नागरिकांना सार्वजनिक परिवहन व्यवस्था उपलब्ध करून देणे हा या बससेवेमागील महापालिकेचा उद्देश आहे. सिटीलिंकच्या करारानुसार दरवर्षी पाच टक्के प्रवासी भाडेवाढ अनुज्ञेय आहे.

जानेवारी २०२२ मध्ये पहिल्या टप्प्यातील पाच टक्के प्रवासी भाडे दरवाढ करण्यात आली होती. मात्र, गेल्या वर्षभरात डिझेल आणि सीएनजीच्या दरात झालेल्या भरमसाट वाढीमुळे सिटीलिंकचा तोटा वाढल्याने यंदा पाच टक्क्यांऐवजी सात टक्के भाडेवाढीचा निर्णय सिटीलिंकने घेतला.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

वाढणारे इंधन दर लक्षात घेता, परिणामी वाढणारा आर्थिक तोटा लक्षात घेता ही भाडेवाढ करण्यात आल्याचे सिटीलिंक कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले. एक जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात येणारी भाडेवाढ उशिराने अखेर १५ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आली आहे.

नियमाने भाडेवाढ
वाढलेले इंधन दर बघता तसेच प्रवासी हिताचा विचार करता कोणतीही अतिरिक्त भाडेवाढ न करता केवळ नियमांनुसार भाडेवाढ करण्यात आली आहे. सुखकर, अद्ययावत, सुरक्षित प्रवास नाशिककरांना उपलब्ध करून देण्यासाठी सिटीलिंक नेहमीच प्रयत्नशील आहे.

त्यासाठी प्रवासी नागरिकांनी सिटीलिंकच्या भाडेवाढीच्या निर्णयाला देखील सहकार्य करावे असे आवाहन सिटीलिंक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी चव्हाणके यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka DGP's Misconduct : महिलेसोबत ‘डीजीपी’चे असभ्य वर्तन!, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी व्यक्त केला संताप

IND vs NZ, ODI: 'मी नाव घेणार नाही, पण...' गावसकरांनी सांगितले न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाला कोण जबाबदार?

Bajaj Pune Grand Tour Traffic Update : 'बजाज पुणे ग्रँड टूर स्टेज-2'साठी २१ जानेवारीला पुण्यातील वाहतुकीत बदल!

Team India Under Gambhir: 'अजिंक्य' टीम इंडियाची घरच्या मैदानावर वाताहत; कोच गौतम गंभीरचे रिपोर्ट कार्ड पाहून बसेल धक्का!

Ambegaon Political : आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का; माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश!

SCROLL FOR NEXT