Maternity-Hospitals-in-India.jpg 
नाशिक

'त्या' अल्पवयीन मुलीची केली प्रसूती; सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन अडचणीत

सकाळवृत्तसेवा

नाशिक : अल्पवयीन मुलगी प्रसूतीसाठी दाखल होऊनही याबाबत पोलिसांना न कळविल्याने सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन अडचणीत आले आहे. संबंधित मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा व त्यातून ती गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. वाचा सविस्तर प्रकार...

असा आहे प्रकार

बापासह दोघांनी अवघ्या १४ वर्षे वयाच्या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार सिडको भागात उघडकीस आला. पीडित अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिला असून, या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. लेखानगर परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या या नराधम बापासह दोघांनी केलेल्या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. तिने मुलाला जन्म दिला असून, तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र ही मुलगी अल्पवयीन असतानाही प्रसूतीपूर्वी किंवा प्रसूतीनंतर 'सिव्हिल'ने याबाबतची माहिती पोलिसांना का कळविली नाही, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे पोलिसांनी 'सिव्हिल'कडे मागितली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने सिव्हिलच्या अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे.

'सिव्हिल'कडून प्रकार झाकण्याचा आरोप

संबंधित अल्पवयीन मुलीची प्रसूतीचा प्रकार पोलिसांना कळविण्याऐवजी झाकण्याचा प्रकार 'सिव्हिल'कडून करण्यात आल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाचे मध्य नाशिकचे अध्यक्ष दीपक डोके यांनी केला. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे चौकशीची मागणी केली आहे. तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील या प्रकरणात व्यक्तिगत लक्ष घातले असून या पीडितेस पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.

गर्भवतीला रुग्णालयात दाखल करतेवेळी तिची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे तिच्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक होते. संबंधित मुलीची माहिती आम्ही बाल कल्याण समितीला दिली आहे. पीडितेच्या आईने तिला दाखल करतेवेळी या मुलीचे वय २० सांगितले. तशी नोंद आमच्याकडे आहे. - डॉ. किशोरप्रसाद श्रीवास, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: काव्या मारनच्या संघात ३००+ विकेट्स घेणारा खेळाडू दाखल; KKRनेही विदर्भच्या पोट्ट्यासाठी मोजले लाखो

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा ठाणेकरांना दिलासा! १०० कोटींची देणी थकीत, अनेक महत्त्वाच्या गोष्टींची तरतूद; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update : इगतपुरी तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना

Australia Cricket: खेळपट्टी तयारीत लुडबुड नसणार; आर्थिक फटका बसल्यानंतर ऑस्ट्रेलियन मंडळाचा पवित्रा

Santwadi Leopard News: संतवाडीत बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद; जन्नुर तालुक्यातील घटना, शेतावर वनविभागाने पिंजरा लावला अन्..

SCROLL FOR NEXT