govt employee.jpg 
नाशिक

कोरोना संदर्भातील कामातील हलगर्जी नडली..अन् गमावली नोकरी !

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक मदन दोंदे यांनी कोरोनासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात न पोचविल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. 

कोरोना संदर्भातील कामातील हलगर्जी नडली 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिकेतर्फे युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यादेखील रद्द केल्या असून, महापालिकेच्या चारही मोठ्या रुग्णालयांमध्ये विशेष कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना संदर्भातील माहिती शासनस्तरावर पोचविण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आली. जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद व महापालिका संदर्भातील कोरोनाचा अहवाल दररोज जिल्हाधिकारी कार्यालयाला पोचवावा लागतो. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दैनंदिन माहिती देण्याची जबाबदारी कनिष्ठ लिपिक मदन हिरामण दोंदे यांच्याकडे आहे. परंतु त्यांनी अहवाल न दिल्याने त्यांच्यावर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी निलंबनाची कारवाई केली.

दैनंदिन अहवाल वेळेत न पाठविण्याबरोबरच विलंबाने कामावर येणे, विनापरवानगी गैरहजर राहणे आदी प्रकारच्या तक्रारी यापूर्वी प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून त्यांची चौकशी करण्यात आली होती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News :ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT