Liquor bottles lying on a school desk chair. In the second picture, Ekta Khaire giving a statement to the municipal officials about the school's problem esakal
नाशिक

Nashik News: छडीचा छम..छम.. नव्हे.. बाटल्यांची टणटण...! ‘हुंडीवाला लेन’च्या बंद शाळेतील प्रकार

पाठ्यशाळेचे मधुशाळेत रूपांतर होताना पुस्तके ठेवली जाणाऱ्या टेबलवर मद्याच्या बाटल्या दिसून येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : शहराच्या राजकारणात ठसा उमटविलेल्या मान्यवरांनी शिक्षण घेतलेल्या हुंडीवाला लेन मधील शाळा शेवटचा घटका मोजत असताना या शाळेत यापुर्वी ऐकू येत असलेला छ..छडीच्या छम..छम..एवजी बाटल्यांची टणटण परिसरातील नागरिकांना ऐकू येत आहे.

त्याला कारण म्हणजे बंद पडलेल्या शाळेकडे महापालिकेने केलेले दुर्लक्ष व या दुर्लक्षामुळे मद्यपींना मिळालेला अंधार कोठडीतील मोकळी जागा. पाठ्यशाळेचे मधुशाळेत रूपांतर होताना पुस्तके ठेवली जाणाऱ्या टेबलवर मद्याच्या बाटल्या दिसून येत आहे. (closed school of Hundiwala Lane become liquor den Nashik News)

मेनरोड परिसरातील हुंडीवाला लेन येथे महापालिकेची विद्यानिकेतन शाळा आहे. माजी महापौर शांताराम बापू वावरे, पंडितराव खैरे यांच्यासह या भागातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी येथे शिक्षण घेतले आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील शाळेला परिसरात भरपूर महत्त्व असले तरी महापालिकेच्या लेखी फारसे महत्त्व नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक वर्षांपासून शाळा बंद अवस्थेत आहे.

दरम्यान याप्रकरणी शिवसेनेच्या उबाठा गटाच्या उपजिल्हाप्रमुख एकता खैरे यांनी या गंभीर परिस्थितीचे वर्णन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्याकडे केले. तसेच पुन्हा शाळा सुरु करण्याची मागणी केली.

यासंदर्भात तातडीने कारवाईचे आश्‍वासन दिले. यावेळी प्रेमलता जुन्नरे, कीर्ती निरगुडे, शोभा घोडके, गीता राहणे, उज्ज्वला जगताप आदी उपस्थित होते. यासंदर्भात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेवून मद्यपींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाणार असल्याचे खैरे यांना माहिती दिली.

मद्यपींचा सतत वावर

मध्यंतरी शालीमार येथील मुलींच्या वसतीगृहाचे काम सुरू असल्याने हुंडीवाला लेन येथील शाळेत मुलींचे स्थलांतरण करण्यात आले होते. त्यावेळी शाळेची निगा राखली जात होती.

परंतू वसतीगृह बंद झाल्यानंतर तेव्हा पासून झालेले दुर्लक्ष अद्यापही कायम आहे. मात्र या दुर्लक्षाचा फायदा मद्यपींना झाला. शाळेच्या अंधाऱ्या खोलीत नशेबाजांचे नंदनवन फुलल्याचे दिसते. रात्रभर मद्याच्या पार्ट्या रंगतात. टेबलावर मद्याच्या बाटल्या दिसतात.

"विद्यानिकेतन शाळेची प्रचंड दुरवस्था झाली आहे. महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. येत्या दहा दिवसात कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडू."- एकता खैरे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना (उबाठा गट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna News: महाशिवरात्र व हरिनाम सप्ताह सुरू असताना बाेकड कापल; जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, ग्रामस्थांचा रस्त्यावर ठिय्या!

Kolhapur Muncipal : पाच वर्षांत १२ स्वीकृत नगरसेवक; कोल्हापूर महापालिकेत भाजपची नवी राजकीय रणनीती

Magh Mela 2026: कुंभमेळ्याचा रेकॉर्ड मोडला! प्रयागराजमध्ये २२ कोटी भाविकांनी मारली डुबकी; ४४ दिवसांच्या माघ मेळ्याची सांगता

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

SCROLL FOR NEXT