Notice News esakal
नाशिक

Nashik News : पर्यावरण नियम न पाळणारे 13 उद्योजकांना क्लोझर

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींसह इतर क्षेत्रातील सुमारे अडीच हजार उद्योगांनी एमपीसिबीची परवानगी घेतली असून त्यात सन २०२३ अखेर सुमारे १८० नवीन उद्योगाचा समावेश वाढल्याचे एमपीसिबीचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी सांगितले.

सतिश निकुंभ

Nashik News : जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींसह इतर क्षेत्रातील सुमारे अडीच हजार उद्योगांनी एमपीसिबीची परवानगी घेतली असून त्यात सन २०२३ अखेर सुमारे १८० नवीन उद्योगाचा समावेश वाढल्याचे एमपीसिबीचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी सांगितले.

तसेच विविध नोटीस देऊनही आपल्या उद्योगातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी असमर्थता दर्शविल्याने अशा १३ कंपन्यांचे उत्पादन बंद करण्याची कारवाई केली आहे. (Closure of 13 entrepreneurs for not following environmental norms nashik news)

जगभरात ज्या ज्या शहरातील औद्योगिक विकास वाढला आहे. त्याठिकाणी आर्थिक सुबत्ता आली आसले तरी या मुळे मात्र मोठ्या प्रमाणावर प्रदूषण निर्माण झाल्याने विविध समस्याही आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. यासाठी महाराष्ट्रात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अशा आस्थापनांना नियत्रंण ठेवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केला जातो.

राज्यात कुठेही आपला उद्योग सुरू करायचे असेल तर पहिली परवानगी ही महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाची लागते. त्या त्या क्षेत्रातील उद्योगाचा विचार करून यात ग्रीन, वाईट, ऑरेन्ज, रेड असे वर्गीकरण करून एक ते पाच वर्षासाठी या विभागामार्फत परवानगी दिली जाते. जिल्ह्यात सन २०२३ अखेर विविध क्षेत्रातील सुमारे अडीचहजारांपेक्षा जास्त आस्थापनांनी आपले एमपीसिबीची परवानगी घेतली आहे.

त्यात रीनवल अधिक आहेत. या वर्षी सुमारे १८० नवीन उद्योगाचा यात नव्याने समावेश आहे. विविध नोटीस देऊनही आपल्या उद्योगातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी असमर्थता दर्शविल्याने अशा १३ कंपन्यांचे उत्पादन तत्काळ बंद करण्याची कारवाई ही एमपीसिबी मार्फत केली आहे. येणारा वर्षात आता पोल्ट्री तसेच छोटे दवाखाने यांनाही बंधनकारक करण्यात आल्याने ही संख्या वाढणार आहे.

''महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळातर्फे प्रदूषण टाळावे, यासाठी विविध उपाययोजना करण्यात आले आहे. हरित लवाद न्यायालयाने अनेक मार्गदर्शन सूचना दिल्याने जिल्ह्यातील उद्योगांनी याचे पालन करून नवीन वर्षात ज्या संस्थानी परवानगी घेतली नसेल त्यांनी त्वरित घेऊन पुढील कारवाई टाळावी.''- अमर दुर्गुळे, उपप्रादेशिक अधिकारी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED seizes Anil Ambani assets : अनिल अंबानींविरुद्ध ‘ED’ची मोठी कारवाई! १ हजार ८८५ कोटींच्या मालमत्ता तात्पुरती जप्त

दिलीप सोपलांनी जागवल्या आठवणी! अजितदादांनीच केले मला मंत्री; चेष्टा करणारा मी एकमेव आमदार, एकदा मी झोपेत असताना सकाळी ६ वाजताच दादांचा कॉल आला अन्‌...

Ajit Pawar Death News LIVE Updates : पायलट सुमित कपूर दिल्लीचा रहिवासी होते

Pune University Exam : मोठी बातमी! पुणे विद्यापीठाच्या गुरुवारी होणारी हिवाळी सत्र परीक्षा पुढे ढकलली

Phulambri News : 'अरे राजू, नुसतेच नारळ फोडतोय का?' – दादांचा तो सवाल, पाथ्रीच्या विकासाची दिशा ठरवणारा क्षण - राजेंद्र पाथ्रीकर

SCROLL FOR NEXT