igatpuri nuksan 1.jpg 
नाशिक

इगतपुरीत ढगफुटीसदृश्य पाऊस; शेतकऱ्यांवर शेतीचे बांध फोडण्याची वेळ

मंगेश शिंदे

इगतपुरी (जि.नाशिक) : इगतपुरी तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला असून (ता.१९) मध्यरात्री तर विजेच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान शेतांत तलावसदृश्य पाणी संचित झाल्याने शेतकऱ्यांना शेतीचे बांध फोडावे लागले.भाताची सोंगणी चालू असल्याने त्यात आता हे पावसाचे संकट अशी शेतकऱ्यांपुढे चिंता उभी ठाकली आहे.

भात पिके दोन तास पाण्याखाली
परतीचा पाऊस व भात पिकावरील रोगराई यामुळे शेतकरी बांधव हताश असताना आता तर पावसाने कहर केला.आज (ता.१९) मध्यरात्री पहाटेच्या सुमारास तर तब्बल दोन तास ढगफुटीचा पाऊस झाल्याने शेतकरी कमालीचा अस्वस्थ झाला. शेतांमध्ये, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे भात पिके दोन तास पाण्याखाली होते. सकाळी पावसाचा झालेला उद्रेक व भात पीके पाण्याखाली पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावले.त्यामुळे भात पिके वाचविण्यासाठी शेतकऱयांनी शेतीचे बांध फोडून पाणी काढून दिले.
भातपिकांसह अन्य पिकांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने सरकारने दखल घ्यावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. 

एकीकडे पंचनामे होतात पण त्यानंतर काय? 

चार महिन्यापूर्वी सुनामी चक्रीवादळ आले. ग्रामीण भागात नुकसानही झाले पंचनामे झाले, तात्काळ कारवाईचे आदेश झाले, परंतु अद्यापही शासनाची मदत मिळाली नाही. केवळ पंचनामे आदेश कागदावरच असतात. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाथी निराशाच असा सूर शेतकरी वर्गातून निघत आहे,
लोकप्रतिनिधी यांनीही शासन दरबारी पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT