Rain in Winter season esakal
नाशिक

Nashik weather Update : भाऊ.. हा सीझन कुठलायं?; ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरणाची गुगली!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : यंदाच्‍या वर्षी विक्रमी पावसाची नोंद झालेली असताना, परतीच्‍या पावसानेही चांगलेच झोडपले होते. गेल्‍या काही दिवसांपासून वातावरणात गारवा जाणवत होता. असे असताना रविवारी (ता.४) दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. शहरातील काही भागात तुरळक पाऊसदेखील झाला. यामुळे नेमका हा सीझन (ऋतू) कुठलाय असा विनोदी प्रश्‍न गप्पांमध्ये नाशिककरांकडून उपस्‍थित केला जात होता. ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरणाच्‍या गुगलीने नाशिककरांच्या आरोग्‍याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्‍त होते आहे. (cloudy weather in winter in city Nashik weather update news)

नोव्‍हेंबर महिन्‍याच्‍या दुसऱ्या आठवड्यापासून कडाक्‍याची थंडी जाणवत होती. अगदी काही भागांतील तापमान दहा अंश सेल्सिअसहून कमी झालेले होते. त्‍यामुळे चौका-चौकांमध्ये शेकोट्या पेटायला लागल्‍या होत्‍या. डिसेंबरमध्ये आणखी कडाक्‍याची थंडी पडेल असा अंदाज वर्तविला जात असताना, गेल्‍या काही दिवसांपासून वातावरणातील गारवा कमी झालेला आहे.

अशात रविवारी (ता.४) सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तर दुपारनंतर शहरातील काही भागांमध्ये तुरळक पाऊस झाल्‍याने पुन्‍हा पावसाळा सुरु झाला की काय, असा प्रश्‍न नाशिककरांना पडला होता. दरम्‍यान ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढलेला होता. तर रात्रीच्‍या वेळी वातावरणात गारवा जाणवत होता.

First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

गेल्‍या पाच दिवसांचे नाशिकचे वातावरणा असे (अंश सेल्सिअसमध्ये)

तारीख किमान कमाल

३० नोव्‍हेंबर १५.२ ३०.००

१ डिसेंबर १३.० २८.७

२ डिसेंबर १३.० ३०.७

३ डिसेंबर -- ३१.३

४ डिसेंबर १५.४ ३०.४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT