Cloudy_Weather 
नाशिक

ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

अजित देसाई

सिन्नर (नाशिक) : तालुक्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यातच शनिवारी (ता. १२) पहाटेपासून थंड हवेच्या लाटेने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला असल्याने दिवसा शेकोट्या पेटवण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. या अशा वातावरणाचा पिकांवर विपरीत परिमाण होणार असल्याने तालुक्यासह जिल्ह्यातील बळीराजाची चिंता वाढली आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे दोन दिवसांपासून थंडीचा जोर ओसरला आणि वातावरण ढगाळ बनले आहे. त्यातच शनिवारपासून थंड वारे वाहायला सुरवात झाली आहे. या अचानक झालेल्या बदलांमुळे आरोग्यासाठी अपायकारक परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीकामे ठप्प झाली आहेत. 

पीकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढला असून, ज्वारीसारख्या पिकांवर चिकट्या रोग डोके वर काढू लागला आहे. तालुक्यात दोन दिवस सूर्याचे दर्शनदेखील झालेले नाही. शहरासह तालुक्यात सर्वत्र हीच परिस्थिती कायम असून, सायंकाळी काही भागात पावसाचे थेंब पडल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. सोमवारपर्यंत अशीच परिस्थिती राहणार असल्याचे हवामान विभागाचे मत आहे. मानवी आरोग्यास, तसेच पिकांसाठी असे वातावरण मात्र अपायकारक ठरणार आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यावर अस्मानी संकट! अवकाळीने गारपीटीसह झोडपलं, आज ११ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

Air Ambulance Crash: पैसा, प्रार्थना, आशा सगळं पणाला लावलं… तरीही मृत्यूने झडप घातली, एअर अ‍ॅम्बुलन्स दुर्घटनेची काळीज पिळवटणारी A टू Z स्टोरी

Vidarbha Maharashtra Rain: विदर्भ मराठवाड्यात अवकाळीचा धुमाकूळ; गारपीट, विजांच्या कडकडाटात रब्बी पिकांचे कोट्यवधींचे नुकसान

Kolhapur Mumbai flight : कोल्हापूर–मुंबई मार्गावर इडिगोची दररोज दिवसातून दोनवेळा विमान सेवा; बुकिंग सुरू

Chennai Beach Accident चेन्नईत फिरताना एका चुकीने केला घात! आयटी कंपनीत इंटर्नशिप करणाऱ्या महाराष्ट्रातील 7 जणांचा करुण अंत, जय पाटीलचा मृतदेह सापडला

SCROLL FOR NEXT