Speaking at a press conference at Chief Minister Eknath Shinde esakal
नाशिक

मुंबईच्या विकासात मराठी माणसाचे अतुलनिय योगदान : CM एकनाथ शिंदे

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : राज्य व मुंबईच्या विकासात मराठी माणसाचे अतुलनीय योगदान आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही भूमिका होती तीच आमची भूमिका आहे. मुंबईसाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे.

मराठी माणसाचे योगदान, त्याग, परिश्रम व कष्टातूनच मुंबईचा विकास झाला आहे. अन्य कामकाजानिमित्त येथे आलेल्यांचे स्वागत आहे. मात्र मराठी माणसाचा कोणीही अपमान करु नये. तो आम्ही सहन करणार नाही असे स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केले. (CM Eknath Shinde statement on governor bhagat singh koshyari speech on mumbaikar marathi nashik Latest Marathi News)

येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तालुका क्रिडा संकुलात विभागीय आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली. मुंबईतील गुजराथी व राजस्थानी नागरीक निघून गेले तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही या राज्यपालांच्या वक्तव्यासंदर्भात विचारले असता त्यांनी आपले मत परखडपणे मांडले.

राज्यपालांचे ते मत वैयक्तिक आहे. त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. मुंबईबाबत आमच्या नेहमीच्या भूमिकेशी आम्ही एकनिष्ठ आहोत. या प्रश्‍नी उपमुख्यमंत्री व राज्यपालांनीही स्पष्टीकरण दिले आहे. राज्यपाल हे महत्वाचे पद आहे.

या पदावर असलेल्या व्यक्तीने सार्वजनिक जीवनात वावरताना व वक्तव्य करताना काळजी घ्यावी. बोलताना भान राखावे. मराठी माणूस आणि मुंबई यांची नाळ जुळलेली आहे. हे दोघे वेगळे करता येणार नाही असे ते म्हणाले.

श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री आपल्या दारी या उपक्रमात राज्यातील दौऱ्याचा मालेगाव येथून शुभारंभ केला. सकाळी अकराला क्रिडा संकुलात त्यांनी उत्तर महाराष्ट्राची विभागीय आढावा बैठक घेतली. अतिवृष्टी, पाऊस, शेतकऱ्यांच्या समस्या, पूर, अतिवृष्टीने झालेले नुकसान, नादुरुस्त रस्ते, वीजेच्या अडचणी, प्रलंबित प्रकल्प या विषयी त्यांनी जिल्हानिहाय माहिती जाणून घेतली.

त्यानंतर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना विविध सूचना दिल्या. पत्रकार परिषदेला वरीष्ठ माजीमंत्री दादा भुसे, उदय सामंत, आमदार सुहास कांदे, आमदार राहुल आहेर, खासदार हेमंत गोडसे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT