Yashwantrao Chavan Maharashtra Open University Vice-Chancellor Dr. Prashant Kumar Patil along with University officials.
Yashwantrao Chavan Maharashtra Open University Vice-Chancellor Dr. Prashant Kumar Patil along with University officials. esakal
नाशिक

Nashik News: CM शिंदेंनी केले पदविका पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण; YCMOUतर्फे प्रमाणपत्र प्रदान

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सध्याच्‍या सत्तासंघर्षाच्‍या केंद्रस्‍थानी असलेल्‍या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारितेतील पदविकेचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून यापूर्वीच पदवी प्राप्त केलेले श्री.शिंदे यांना आता विद्यापीठातर्फे वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदविका शिक्षणक्रम पूर्ण केले असून त्‍यांना पदविका प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. (CM Shinde Completed Diploma in Journalism Certificate awarded by YCMOU Nashik News)

मुक्‍त विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांना प्रमाणपत्र देण्यात आले. हा पदविका शिक्षणक्रम मुख्यमंत्री शिंदे यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये विशेष प्राविण्यासह अर्थात ७७.२५ टक्के गुण मिळवून पूर्ण केला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षा’ येथे झालेल्या सोहळ्याप्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरू पाटील यांच्या समवेत विद्यापीठाचे कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, विद्यापीठाचे मुंबई विभागीय केंद्र संचालक डॉ. वामन नाखले उपस्थित होते.

यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुक्त विद्यापीठाची बी.ए. पदवी विशेष प्राविण्यासह पूर्ण केली आहे. त्याचप्रमाणे मानवी हक्क प्रमाणपत्र शिक्षणक्रमही विशेष प्राविण्यासह पूर्ण केले आहे. अनेक कारणांनी शिक्षणापासून दुरावलेल्‍या विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्‍वप्‍न पूर्ण करण्याचे काम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT