CM Eknath Shinde News Esakal
नाशिक

CM Eknath Shinde | उल्हासनगरच्या धर्तीवर गोदावरीत हर्बल फवारणी : मुख्यमंत्री शिंदे

सकाळ वृत्तसेवा

चांदोरी (जि. नाशिक) : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात सांडपाणी तसेच, येथील औद्योगिक वसाहतीतील केमिकलयुक्त पाणी मिसळत असल्याने नदीपात्रात दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे.

गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविण्यासह औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याबाबत शासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी निफाडचे आमदार दिलिप बनकर यांनी सभागृहात लक्षवेधीद्वारे केली.

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोदावरी नदीपात्रातील पानवेलींची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी नदीपात्रात तत्काळ उल्हासनगरच्या धर्तीवर हर्बल फवारणी करण्याच्या सूचना नाशिक महापालिकेसह जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. (CM Shinde statement Herbal spraying in Godavari on lines of Ulhasnagar nashik News)

‘सकाळ’मध्ये प्रकाशित झालेले वृत्त

गोदावरी प्रदूषणाबाबत ‘सकाळ’मध्ये २८ फेब्रुवारीला ‘पानवेलींसदर्भात शासनाची चालढकल’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत श्री. बनकर म्हणाले, गोदावरी प्रदूषणामुळे नदीत घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले असून, मोठ्या प्रमाणात पानवेली पसरत आहेत.

त्याचा परिणाम निफाड तालुक्यात गोदापात्रालगतच्या चाटोरी, सायखेडा, चांदोरी, गोंडेगाव, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, कोठुरे, मांजरगाव आदी गावांतील नळपाणी पुरवठा योजनांवर होत आहे.

नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत असल्याने अनेक साथीच्या रोगांना बळी पडावे लागत आहे. गोदावरी नदीतील जलपर्णी काढण्यासह प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेसह सबंधित विभागाकडे सातत्याने तक्रार करूनही प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही केली जात नाही.

शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने गोदावरी काठालगत असलेल्या नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या उल्हास नदीतून पाच मोठ्या महापालिका पाणी उचलतात. या नदीपात्रात नेरळच्या सगुणा फाउंडेशनच्या माध्यमातून ड्रोनच्या सहाय्याने पानवेलींवर औषध फवारणी केली जात होती.

त्यामुळे तेथील पानवेली हळूहळू नाहीशा होऊन पात्र पानवेलींमुक्त झाले. पानवेली निर्मूलनासाठी नदीत एक रसायन फवारण्यात आले. देशातील काही नद्यांमध्ये हा प्रयोग करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

या प्रयोगामुळे साधारणपणे ३ वर्षे पानवेलींची वाढ होत नाही. हाच प्रयोग नाशिकच्या गोदावरी नदीपात्रातील जलपर्णीचा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी करावा. नाशिक महापालिकेसह नदीच्या हद्दीतील ज्या कंपन्या आपले दूषित पाणी नदीपात्रात सोडतात अशा कंपन्यांवर व महापालिकेवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार बनकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

SCROLL FOR NEXT