Falling in adjacent red circles. Tehsildar Siddharth More, Chief Officer Vivek Dhande, Police Inspector Pritam Chaudhary, Engineer Rahul Cholke etc. esakal
नाशिक

Nashik News: नांदगावच्या पुरातन वेसची पडझड! मालकी सरकारची स्पष्ट झाल्याने मूळ रूपात जपत डागडुजी होणार

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : कधीकाळी गावाची मजबूत तटबंदीची साक्ष देणाऱ्या गाववेसीची पडझड होऊ लागली असून गेल्या दोन दिवसापासून वेशीच्या उजव्या बाजूच्या बुरुजातून दगडमाती मिश्रित मलबा ढासळू लागला आहे.

शहरातील वरची वेस, शिवकालीन पुरातन अशी ओळख असलेली ही दगडी वेश शहराची शान आहे.

या पुरातन वेशीच्या प्रवेशद्वारावर बाभळी उगवल्याने बुरूजातल्या दगडाच्या भिंतीला तडे गेल्याने गेल्या दोन दिवसापासून बुरूजातली मातीमिश्रित मलबा कोसळला. सुदैवाने हा मलबा पालिकेच्या स्वच्छतागृहाच्या छतावर पडल्याने संकटातील भीषणता टाळली गेली. (collapse of Nandgaon ancient customs ownership of government becomes clear repairs will be maintained in original form Nashik News)

'सकाळ’ने २१ जानेवारी २३ ला दिलेले वृत्त

हिंदू पंचाचे चेतन पाटील, अनिल धामणे व भू-विकसक बाळासाहेब मोकळ यांनी मुख्याधिकारी विवेक धांडे यांची भेट घेत पुरातन गाववेस संरक्षित राहावी यासाठी विनंती केली.

मात्र गाववेस पुरातन असेल तर पुरातत्त्व विभाग, पालिका, महसूल या पातळीवरच्या मिळकतीच्या नोंदी तपासून घेतल्यावर गाववेस संरक्षित करण्याबाबत उपाययोजनांना चालना देता येईल अशी भूमिका मुख्याधिकारी धांडे यांनी मांडली.

मात्र स्ट्रक्चर्स ऑडिट करून घेण्यावर या चर्चेत एकमत झाले, त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पॅनेलवरील वास्तुतज्ज्ञ भावसार यांना विनंती करण्यात आली. त्याप्रमाणे ते उद्या गाववेसीची पाहणी करून आपला अहवाल सादर करणार आहेत.

दरम्यान गाववेस नेमकी कुणाची पालिकेची की खासगी ट्रस्टची याचा नेमका उलगडा होत नव्हता.

गाववेस व लगतचे क्षेत्रफळाची नेमकी नोंद तपासण्यात आली व अशी नोंद भूमी अभिलेखातल्या नगर भूमापन क्रमांक ८९७ वर आढळली व ती सरकारी टाऊन हॉल, बुरूज महाराष्ट्र सरकार अशी असून धारणाधिकार ग प्रमाणे गाववेस व त्याभोवतीचे ४१.९० क्षेत्रफळ सरकारचे असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले, त्यामुळे मुख्याधिकारी धांडे यांनी ही बाब तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या निदर्शनास आणून दिली.

तहसीलदार मोरे, पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल चोळके यांनी मुख्याधिकारी धांडे यांच्यासमवेत पडझड होत असलेल्या बुरुजाची पाहणी केली.

हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभाग सार्वजनिक बांधकाम, पालिका, महसूल अशा पातळीवर हालचाली सुरु झाल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळने दिले होते वृत्त

गाववेसच्या बुरुजालगत झाडाची वाढ होत असून त्याची मूळे बुरुजात घुसत असल्याबद्दल सतर्कता बाळगण्याबाबत ‘सकाळ’ने जानेवारीत सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.

त्याची सर्व संबंधितानी वेळीच दखल घ्यायला हवी होती अशी प्रतिक्रिया आज नागरिकांनी व्यक्त केल्या. आता गाववेस नेमकी कुणाची याबाबत अभिलेखातल्या मूळ नोंदी सापडल्याने गाववेसीचा डागडुजीचा मार्ग मोकळा

झाला आहे. मूळ स्वरूप तसेच ठेवून रिकाम्या जागेवर अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी घेत नव्या अभियांत्रिकी रचनेत तिची उभारणी शक्य आहे किंवा नाही याबाबत वास्तुविशारदांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT