Blood Donation Camp
Blood Donation Camp esakal
नाशिक

HPT- RYKत रक्तदान शिबिरात 194 रक्तपिशव्यांचे संकलन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव सर डॉ. मो. स. गोसावी सर यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त आणि एचपीटी आर्टस् अँड आरवायके सायन्स महाविद्यालयाच्या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि अर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले.

रक्तदान हेच श्रेष्ठदान मानत गेल्या १२ वर्षांपासून सर डॉ. मो. स. गोसावी सरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. आजवर AB-, Bombay यांसारख्या दुर्मिळ रक्तगट असणाऱ्या रक्तदात्यांनी सुध्दा महाविद्यालयाच्या रक्तदान शिबिरात रक्तदान केले आहे. (Collection of 194 blood bags in blood donation camp at HPT RYK college Nashik Latest Marathi New)

यावर्षी महाविद्यालयात एकाच वेळी सेमिनार हॉल आणि प्रि. टी. ए. कुलकर्णी हॉल येथे शिबिर पार पडले. यावेळी तब्बल १९४ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. भविष्यातील स्वतः ला आणि अपत्यांना होणाऱ्या थॅलेसेमिया आजाराला अटकाव करण्यासाठी रक्ताच्या नमुन्यांचे थॅलेसेमिया स्क्रीनिंगद्वारे परीक्षण करत आणि उपचार सांगितले जातात. यावेळी शिबिरात थॅलेसेमिया स्क्रीनिंग चाचणीही करण्यात आली.

यावेळी शिबिराचे उद्घाटन सर डॉ.मो. स. गोसावी यांनी फित कापून केले. वाढदिवसानिमित्त सर डॉ. मो. स गोसावी सरांचे औक्षण महाविद्यालयातील प्राध्यापिकांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एन.सूर्यवंशी, एसएमआरके महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, बीवायके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी, उपप्राचार्या डॉ. मृणालिनी देशपांडे, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. जितेंद्र पाटील, प्रा. राकेश वळवी, एनएसएस महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती कोल्हे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आनंदा खलाणे, तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी शिबिर यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Naxalite : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; सहा नक्षलवाद्यांचा खात्मा

Ketaki Chitale : केतकी चितळेची ठाकरेंना उद्देशून वादग्रस्त पोस्ट; म्हणाली, लाज कशी वाटत नाही...

Uddhav Thackeray : ''मोदींनी डोळा मारलाय, पण मी जाणार नाही'', उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना चिमटा

Raj Thackeray : ''अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही'' राज ठाकरे पुण्यात नेमकं काय म्हणाले?

T20 WC 2024 : 24 मे पूर्वी चार दिवस आधी... बीसीसीआयचा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना दिलासा

SCROLL FOR NEXT