Godaghat file photo esakal
नाशिक

Nashik News : गोदावरी नदीपात्रालगत 400 किलो प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन

गोदापार्क पंचवटी नदीपात्राच्या कडेला विशेष स्वच्छता मोहीम आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या आदेशाने राबविण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत गोदापार्क पंचवटी नदीपात्राच्या कडेला विशेष स्वच्छता मोहीम आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या आदेशाने राबविण्यात आली. (Collection of 400 kg plastic waste along Godavari river Nashik News)

घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी मदन हरीशचंद्र, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे आदींच्या उपस्थितीत गोदापार्क ते होळकर पूल यादरम्यान गोदापार्क व नदीपात्राच्या बाजूचा अंदाजे ४०० किलो प्लॅस्टिक व तत्सम कचरा संकलित करण्यात आला.

मोहिमेदरम्यान जनजागृती करण्यात आली. मोहिमेत स्वच्छता निरीक्षक उदय वसावे, मुकादम दिनेश सोळंकी, नरेश नागपुरे व पंधरा सफाई कर्मचारी तसेच वॉटरग्रेस प्रॉड्क्टसचे विलास नाईकवाडे, कृष्णा शिंदे आणि त्यांचे बारा सफाई कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला होता.

गुरुवारपासून तपोवन रस्त्यावरील स्वामिनारायण मंदिर परिसरातील गोदाकाठाची स्वच्छता केली जाणार आहे, याशिवाय कुंडातील कचराही टप्प्याटप्याने काढला जाणार असल्याची माहिती संजय दराडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

C.P. Radhakrishnan Vice President of India : सी. पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

Sanjay Dutt: अजय देवगन संजय दत्तचा फॅमिली डॉक्टर? संजय दत्तचे हैराण करणारे खुलासे

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात तणावाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

SCROLL FOR NEXT