Nashik District Collector esakal
नाशिक

Nashik News: नाशिक देशातील टॉप शहरांच्या स्पर्धेत : जिल्हाधिकारी जलज शर्मा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: वेगाने विकसित होणारे शहर म्हणून ओळखले जात असलेले नाशिक देशातील ‘टॉप’ शहरांच्या स्पर्धेत आहे.

राज्यातील मुंबई, पुणे या शहरांमध्ये ज्या प्रकारचे इंटेरिअरचे मटेरिअल आणि टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, ते सर्व नाशिकमध्ये उपलब्ध असून, एक्स्पोमध्ये त्याची प्रचीती दिसून येत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.

गुरू पब्लिसिटी आणि दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स यांच्यातर्फे ठक्कर डोम येथे आयोजित ‘स्मार्ट हाउस इंटेरिअर एक्स्पो’च्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते. (Collector Jalaj Sharma statement Nashik in competition of top cities in country news)

वास्तुविशारद प्रफुल्ल कारखानीस, ‘क्रेडाई’ नाशिकचे अध्यक्ष कृणाल पाटील, दीपक बिल्डर्सचे दीपक चंदे, आयआयए नाशिक सेंटरचे अध्यक्ष वास्तुविशारद रोहन जाधव, बी. बी. चांडक, मुख्य आयोजक तथा गुरू पब्लिसिटीचे संचालक रवी पवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शर्मा यांनी एक्स्पोमधील स्टॉल्सला भेट देत इंटेरिअर मटेरिअल्स आणि टेक्नॉलॉजीची माहिती जाणून घेतली.

एक्स्पोचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. ‘नाशिकची ओळख आध्यात्मिक शहर आहे. आता ते विकसित होणारे शहर म्हणून पुढे येत आहे. येथील निसर्गही प्रसिद्ध आहे. निसर्ग, अध्यात्म आणि प्रगती यांचा सुरेख संगम साधण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे एक्स्पो आहे. नाशिकमधील घरे, येथील घरांची शैली ज्या पद्धतीने समोर येत आहे, ती सुंदरतेची लाट आहे.

आधुनिक घरे कशी असावीत, याचे उदाहरण या एक्स्पोच्या माध्यमातून देता येईल,’ असे गौरवोद्‌गार विविध मान्यवरांनी काढले. रवी पवार म्हणाले, की गेल्या वर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर आम्ही हा एक्स्पो आयोजित केला असून, यालाही मोठा प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा आहे.

इंटेरिअरसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्याने इंटेरिअरबाबतच्या नवीन संकल्पना पाहण्याची मोठी संधी नागरिकांना आहे. नागरिकांनी या एक्स्पोला भेट द्यावी.

उत्तर महाराष्ट्रातील नामवंत सहभागी

एक्स्पोमध्ये उत्तर महाराष्ट्रातील १०० स्टॉल्स उभारण्यात आले असून, गृह सजावटीच्या असंख्य पर्यायांची उपलब्धता एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात इंटेरिअर, एक्स्टेरिअर, स्मार्ट होम, डेकॉर आर्ट, बिल्डिंग मटेरियल्स या श्रेणींचा समावेश आहे. प्रदर्शनात उत्तर महाराष्ट्रातील नामांकित समूहांचा सहभाग असल्याने त्यांचे मटेरिअल आणि टेक्नॉलॉजी पाहण्याची उत्तम संधी नाशिककरांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पहिल्याच दिवशी गर्दी

एक्स्पोच्या पहिल्याच दिवशी अनेक नागरिकांनी गर्दी करीत इंटेरिअरचे मटेरिअल आणि तंत्रज्ञान जाणून घेतले. एक्स्पोमध्ये प्रशस्त स्टॉल्स उभारले असून, लाइव्ह डेमो पाहण्याची संधी नागरिकांना मिळत आहे. गृहसजावटीचे असंख्य पर्याय असल्याने नागरिकांनी स्टॉल्स धारकांकडून त्यांचे संपर्क क्रमांक मिळविले. शनिवारी, रविवारी गर्दीचा मोठा उच्चांक पाहावयास मिळेल, अशी आयोजकांना अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT