Collector Sharma statement about strict survey of Nav Bharat Literacy nashik news gbp00 esakal
नाशिक

Nashik District Collector : ‘नवभारत साक्षरते’चे काटेकोर सर्वेक्षण व्हावे : जिल्हाधिकारी शर्मा

सकाळ वृत्तसेवा

Nashik District Collector : केंद्र सरकारमार्फत १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करण्यासाठी एप्रिल २०२२ ते मार्च २०२७ या कालावधीत ‘नवभारत साक्षरता कार्यक्रम’ सुरू करण्यात आला आहे.

कार्यक्रम यशस्वितेसाठी गावपातळीवर होणारे सर्वेक्षण काटेकोरपणे करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत. (Collector Sharma statement about strict survey of Nav Bharat Literacy nashik news)

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात नवभारत साक्षरता कार्यक्रमाबाबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी शर्मा बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा जिल्हास्तरीय नियामक परिषदेचे सदस्य सचिव भगवान फुलारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, जिल्हा परिषदेचे प्रभारी उपशिक्षणाधिकारी (योजना) आर. आर. बोडके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, की गावपातळीवर करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणासाठी मुख्याध्यापकांच्या मदतीने सर्वेक्षकांची निवड करून त्यांची यादी येत्या दोन दिवसांत सादर करावी. त्यानंतर करण्यात येणारे सर्वेक्षण १५ दिवसांत पूर्ण करण्यात यावे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच, ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणात जे लोक शिक्षण घेण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांचीही माहिती घेण्यात यावी. त्याचप्रमाणे सर्वेक्षण करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक यांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाची माहितीही सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी या वेळी दिल्या.

बैठकीदरम्यान प्रभारी उपशिक्षणाधिकारी बोडके यांनी नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या कार्यवाहीच्या माहितीचे सादरीकरण करताना सांगितले, की जिल्ह्यात २०२३-२४ या वर्षासाठी २८ हजार २५३ इतके उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी ५३ लाख ८९ हजार २६० इतका निधी प्राप्त झाला आहे.

त्याचप्रमाणे ‘एनआयईपी’ या ॲपवर सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. तालुका व शाळानिहाय निश्चित केलेल्या निरक्षर उद्दिष्टाप्रमाणे स्वयंसेवकांची निवड करण्यात आल्याचेही श्री. बोडके यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT