Car on Divider
Car on Divider esakal
नाशिक

Nashik News : कॉलेजरोडला कार थेट दुभाजकावरच; अंधुक पथदीपांमुळे घडली घटना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कॉलेजरोड परिसरातील एका रस्त्यावर पथदीपांचा प्रकाश अंधुक असल्याने नियंत्रण सुटलेली कार थेट रस्त्यातील दुभाजकावरच जाऊन अडकल्याची घटना रविवारी (ता. २२) रात्री घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र, वाहतूक कोंडी झाली होती. वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, या रस्त्यावरील पथदीप बदलण्याची मागणी परिसरातील वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजरोड परिसरातील बीवायके कॉलेजच्या पाठीमागील बाजूला असलेल्या रस्त्यालगतच्या पथदीपांचा प्रकाश अंधूक असून, त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहने चालविणे चालकांना काहीसे जिकिरीचे ठरते. (College Road car directly at bifurcation incident happened due to dim street lights Nashik News)

प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

याच रस्त्यावरुन रविवारी (ता. २२) रात्री जाणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि अंधुक प्रकाशामुळे कार थेट दुभाजकावरच जाऊन अडकली. कारचालकाने प्रसंगावधान राखून वेळीच ब्रेक लावल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, वाहन दुभाजकावरच अडकल्याने चालकाचा गोंधळ झाला. तर, यामुळे वाहतुकीचीही कोंडी निर्माण झाली.

गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या मार्गांवरील अंधुक पथदीपांमुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या असून, महापालिकेने सदरील पथदीप बदलून नवीन पथदीप बसविण्याची मागणी परिसरातील वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT