Police combing operation in commissionerate area  esakal
नाशिक

Nashik News : आयुक्तालय हद्दीत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहर पोलिसांनी मंगळवारी (ता. ६) शहरभर कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या मोहिमेत पोलिसांनी १५४ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेत चौकशी केली, तर दोघा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे.

जबरी चोऱ्या, घरफोड्या, चैन स्नॅचिंग या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांच्या आदेशान्वये सदरील कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. (Combing operation of police in commissionerate area Nashik News)

गेल्या काही दिवसांमध्ये शहरात हाणामाऱ्या, चोरी, घरफोड्या, जबरी चोऱ्या सातत्याने होत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये मंगळवारी सायंकाळी ६ ते रात्री ८ यादरम्यान कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

पोलिस निरीक्षकांनी बीट अंमलदाराकडून याद्या तयार करून घेतल्या. गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी यांच्या सूचनेनुसार सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिस आयुक्तांसह तीन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त, १५ प्रभारी पोलिस निरीक्षक, २९ सहायक निरीक्षकांसह २७० अंमलदारांसह गुन्हे शाखा युनिट एक व दोनची पथके, तसेच गुन्हे शाखेकडील सर्व पथकांतील कर्मचारी व अधिकारी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ वेळी कार्यरत होते.

यात सराईत गुन्हेगार, तडीपार, वॉन्टेड, वॉरंटमधील संशयितांसह हिस्ट्रिशीटर तपासून ताब्यात घेण्यात आले. १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी ही धडक कारवाई केल्याने संशयितांसह टवाळखोरांचे धाबे दणाणले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT