IAS Bhagayshree Banayat esakal
नाशिक

NMC News: ...तर ठेकेदार जाणार काळ्या यादीत; आयुक्त भागश्री बानायत यांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

NMC News : शहरात सुरू असलेली रस्त्यांची कामे व यापूर्वीच्या दोन, अडीच महिन्यात झालेल्या कामांची स्वतः पाहणी करणार असून रस्त्यांवर खड्डे आढळल्यास ठेकेदारांना दोषी ठरवून त्यांना काळ्या यादीत टाकले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी दिली. (Commissioner Bhagyashree Banayat warning to construction contractors about potholes road NMC News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शहरात अद्याप मुसळधार पावसाला सुरवात झाली नाही. परंतु रस्त्याबाबत आतापासूनच नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी सुरू झाल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आयुक्त बाणायत यांनी रस्ते कामांची गंभीर दखल घेत रस्त्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्याने कामे झालेल्या व सध्या कामे सुरू असलेल्या रस्त्यांवर खड्डे आढळून आल्यास ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. लायबिलिटी कालावधीतील रस्त्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी केले आहेत.

त्याचबरोबर स्मार्टसिटीमार्फत सुरू असलेल्या कामांचीदेखील त्यांनी झाडाझडती घेतली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना त्रास होणार नाही, या संदर्भात सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT