sakal-news-impact esakal
नाशिक

SAKAL Impact News : गुटख्याच्या ‘विशाल’ कारवाईची आयुक्तांकडून चौकशी

हद्दीबाहेर जाऊन कारवाई करणे संबंधितांना भोवणार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रविवारी (ता. २९) अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुटख्याची विशाल कारवाई करून संशयितांना नाशिक रोडला नेण्यात आले.

त्यानंतर चिरीमिरीची प्रक्रिया पार पाडून भलत्यावरच गुन्हा दाखल केल्या प्रकरणाची पोलिस आयुक्तांनी चौकशीचे आदेश बजावले आहेत. त्यानुसार, या कारवाईतील सामील असलेल्यांकडून परिमंडळ दोन उपायुक्तांनी खुलासे मागविले आहेत. (Commissioner inquiry into huge operation of Gutkha SAKAL Impact News nashik news)

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये रविवारी (ता. २९) परिमंडळ उपायुक्त कार्यालयाचा कर्मचारी व नाशिक रोड पोलिस ठाण्यात वाहनचालक म्हणून नेमणुकीला असलेल्या कर्मचारी या दोघांनी तीन किरकोळ गुटखा विक्रेत्यांना ताब्यात घेतले होते.

इनोव्हातून आलेल्या या कर्मचाऱ्यांनी तिघांना वाहनातून नाशिक रोडला नेले. चौकशीतून ते ज्याच्याकडून गुटखा खरेदी करतात त्यास ताब्यात घेतले. तिघांकडून ‘चिरीमिरी’ घेऊन सोडून दिले आणि चौथ्यावर गुन्हा दाखल केला.

कदाचित चौथ्यालाही सोडले असते परंतु तोपर्यंत अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कारवाईची वाच्यता पोलिस वर्तुळात पसरली. त्यामुळे चौथ्याविरुद्ध सुमारे १८ हजारांच्या गुटख्या प्रकरणी ‘विशाल’ कारवाई करून जप्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

या गुन्ह्यात फिर्यादीही नाशिक रोडचा पोलिस कर्मचारी असून, गुन्हा मात्र अंबड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. सदर सारा प्रकारच अत्यंत संशयास्पद असल्याची चर्चाच पोलिस वर्तुळात होती.

यासंदर्भात सविस्तर वृत्त ‘सकाळ’मध्ये ‘कुंपणच शेत खाते तेव्हा...’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची गंभीर दखल पोलिस आयुक्तांनी घेतली असून, त्यासंदर्भात परिमंडळ दोनचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, उपायुक्तांनी त्या कारवाईशी संबंधित असलेल्यांकडून खुलासे मागविले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

SCROLL FOR NEXT