Nashik Municipal Corporation esakal
नाशिक

Nashik NMC News : नागरिकांच्या तक्रारी 8 दिवसात सोडवा; आयुक्तांच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

Nashik NMC News : नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठीच्या ‘एनएमसी ई कनेक्ट’ ॲप, पीएम पोर्टल, आपले सरकार व मुख्यमंत्री सचिवालयाकडे दाखल तक्रारींची संख्या वाढत असून, सद्यःस्थितीत महापालिकेच्या अॅपवर ७१४ तक्रारी, ‘आपले सरकार’ व ‘पीएम’ या पोर्टलवर ७० तक्रारी प्रलंबित असल्याने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी आठ दिवसात सोडविण्याच्या सूचना विभाग प्रमुखांना दिल्या. (Commissioner instructions to resolve citizens complaints within 8 days nashik news)

तांत्रिक कारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसल्याने प्रशासकीय राजवट लागू आहे. या प्रशासकीय राजवटीत लोकप्रतिनिधींची ढवळाढवळ होत नसल्याने कामकाज सुरळीत होणे अपेक्षित आहे. मात्र, नाशिक महापालिकेमध्ये परिस्थिती उलट असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या तक्रारींची प्रत्यक्षपणे दाखल घेतली तर जात नाही.

त्याशिवाय एनएमसी ई-कनेक्ट (NMC E-Connect) व आपले सरकार पोर्टलवरदेखील मोठ्या प्रमाणात तक्रारी प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी महापालिकेकडून विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर घरबसल्यादेखील तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली.

२०१६ मध्ये महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्मार्ट नाशिक ॲप कार्यान्वित केले होते. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना तक्रार करण्याबरोबरच विकासकामांची प्रगती किती झाली, याचीदेखील नोंद होत होती. तसेच, नागरिकांना फोटो अपलोड करण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

या ॲपवर वर्षभरात ६० हजाराहून अधिक तक्रारी दाखल झाल्या. प्रकरणांची सोडवणूक सात दिवसात करणे बंधनकारक करण्यात आल्याने नागरिकांचा तक्रारींचा ओघ वाढण्याबरोबरच तक्रारीदेखील तत्काळ सुटू लागल्या.

त्यानंतर नाशिक स्मार्ट ॲपचे, नाशिक ई- कनेक्ट असे नामकरण करून त्यात काही प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या. नाशिककरांनी महापालिकेचे दोन्ही ॲप स्वीकारले. मात्र, महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर तक्रारी सोडविण्याचे प्रमाण कमी झाले. त्याला कारण लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.

तक्रारींचा वाढला ओघ

सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या १३२, पशुसंवर्धन विभाग १३६, सार्वजनिक आरोग्य ४२, मलनिस्सारण विभागाच्या ७२, पाणीपुरवठा विभागाचे ५९, अतिक्रमण विभागाचे १०६, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ९९, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ९१, उद्यान विभागाच्या ४१, नगर नियोजन विभागाच्या २०, विद्युत विभागाच्या ४१ तक्रारी प्रलंबित आहे. पीएम पोर्टलवर दहा तर आपले सरकार पोर्टलवर ७० तक्रारी प्रलंबित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Indian Railways Recruitment 2025: भारतीय रेल्वेत ज्युनियर इंजिनिअरच्या पदांसाठी भरती सुरू; येथे वाचा संपूर्ण माहिती

Latest Marathi Breaking News Live Update : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा संताप उसळला: मदत वाटपातील विषमतेविरोधात वैजापूरमध्ये उपोषण

BJP vs Shivsena: २०२९ तयारी? भाजपमधील इनकमींगची दूसरी बाजू काय? शिंदे गटाच्या नेत्यांविरुद्ध ‘स्ट्राँग प्लॅन-B’ तयार?

एक-दोन नाही सात दिवसात शूट केलाय गोंधळ सिनेमाचा 25 मिनिटांचा वनटेक सीन !

SCROLL FOR NEXT