MLA Satyajit Tambe with a delegation of orphans. esakal
नाशिक

Nashik Satyajit Tambe : अनाथ युवक-युवतींचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध; आमदार सत्यजित तांबेंची भेट

सरकारी नोकरीत अनाथांसाठी आरक्षण आहे. परंतु त्यात अनेक अडचणी असल्याचे समोर आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Satyajit Tambe : सरकारी नोकरीत अनाथांसाठी आरक्षण आहे. परंतु त्यात अनेक अडचणी असल्याचे समोर आले आहे. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन अनाथ मुलांचे असे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार सत्यजित तांबेंनी दिली.

अनाथ मुलांनी आमदार तांबेंना मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी सरकारी नोकरीतील येणाऱ्या समस्या मुलांनी मांडल्या. (Committed to solving problems of orphaned youth by satyajit tambe nashik news)

‘अनाथांची माय’ म्हणून ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचा स्मृतिदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील काही अनाथ युवक-युवतींनी मुंबईमध्ये आमदार तांबेंची भेट घेतली. तसेच अनाथांच्या प्रश्नांवर कार्यरत असणाऱ्या आमदार श्रीकांत भारतीय यांच्याशी देखील मुलांची भेट घालून दिली. त्यांनीही हे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

प्रमिलासारख्या पालकांचे छत्र हरपलेल्या होतकरू मुलांना उभारी घेण्याकरिता मायेचा हात देण्याची नितांत गरज आहे. पुरेशा मदतीअभावी या मुलांच्या आयुष्याची दिशा हरवून जायला नको, म्हणून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी यापुढेही कटिबद्ध असणार आहे, असे आमदार तांबेंनी सांगितले. आमदार तांबे यांच्याकडून सातत्याने याप्रश्नी विधान परिषदेत आवाज उठविला आहे.

''धुळ्याची प्रमिला शिरसाठ ही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पहिल्यांदा भेटली. बालपणातच पितृछत्र हरपलेल्या प्रमिलाने स्वतःच्या जिद्दीवर समाजकार्य विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे, या गोष्टीचे खूप कौतुक वाटले. परंतु, ‘मला कोणीच नाही’ अशी खंत तिने बोलून दाखविल्यावर मात्र मन हेलावले. त्या वेळी त्यांचे प्रश्न शासनाच्या माध्यमातून सोडविण्याचा निर्धार केला आहे.''- सत्यजित तांबे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

SCROLL FOR NEXT