State President Milind Kamble, Prashant Sutar, Chandrasekhar Fasale, Pawan Talware, District President Dinkar Sangle along with State President of the Zilla Parishad Accounting Staff Association present at the state level meeting. esakal
नाशिक

Nashik ZP News : लेखाधिकारींच्या रखडलेल्या पदोन्नत्या तत्काळ कराव्यात; समिती स्थापन

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : सहाय्यक लेखाधिकारी संवर्गातून लेखाधिकारीपदी दरवर्षी पदोन्नती होत नसल्याने जिल्हा परिषदांमधील सहाय्यक लेखाधिकारी यांच्यावर अन्याय होतो.

त्या नियमितपणे होण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना (राज्यस्तरीय) बैठकीत कृती समितीची स्थापना करण्यात आली. राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार बैठकीत झाला. (Committee constituted by zp Accounts Staff Association nashik news)

संघटनेच्या नाशिक शाखेतर्फे राज्यस्तरीय बैठक राज्याध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाली. बैठकीस राज्य सरचिटणीस प्रशांत सुतार, राज्य कोशाध्यक्ष चंद्रशेखर फसाळे, कार्याध्यक्ष महेश कोत्तावार, राज्य उपाध्यक्ष पवन तलवारे यांनी मार्गदर्शन केले.

मागील सभेचे कार्यवृत्तांत मंजूर करणे, सहाय्यक लेखाधिकारीपदास राजपत्रित दर्जा देणे व ग्रेड पे करणे, शासन ग्रामविकास विभाग पूरक पत्र २० सप्टेंबर २०२२ नुसार संघटनेस औद्योगिक न्यायालयाकडून मान्यता घेणे, लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० वर्षे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, कनिष्ठ लेखाधिकारी हे पद पूर्णत: पदोन्नतीचे पद करणे, लेखा संवर्गातील पदांना असलेल्या परीक्षा वेळेत घेणे, लेखा कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त कामाचा बोजा कमी करण्याकामी धोरण ठरविणे आदी विषयांवर चर्चा झाली. सहाय्यक लेखाधिकारी संवर्गातून लेखाधिकारी पदोन्नत्या नियमित होत नसल्याने त्यावर कृती समितीची स्थापना बैठकीत करण्यात आली.

या समितीत उदय कुलकर्णी (जळगाव), श्यामकांत पाटील (नाशिक), श्‍याम जगताप (रत्नागिरी), सुनील गंगावणे (जालना) यांना स्थान देण्यात आले. समितीला श्रीहरी डोसे (बुलढाणा) यांची मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली. नाशिक शाखेचे जिल्हाध्यक्ष दिनकर सांगळे यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या कामकाजाचा आढावा सादर करीत, प्रलंबित मागण्या मांडल्या.

या मागण्या सोडविण्यासाठी राज्य शासनाकडे बैठक घेण्याची मागणी त्यांनी केली. संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस मंदाकिनी पवार व कार्याध्यक्ष मंगेश जगताप, राज्य सहसचिव नितीन पाटील यांनी स्वागत केले. बैठकीला राज्यातील २१ जिल्हा परिषदांमधील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

Latest Marathi News Live Update : महायुती सरकारचा 'आनंदाचा शिधा' बंद शक्यता, कारण काय?

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

SCROLL FOR NEXT